शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हिंगोलीतील बससेवा तिसऱ्या दिवशीही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:03 AM

मागील तीन दिवसांपासून हिंगोली बसस्थानकातून एकही बस धावली नाही. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने मात्र अद्याप बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनाद्वारे प्रवासी जात आहेत. हिंगोली डेपोतील अनेक फेºया रद्द झाल्याने प्रवासी व शाळकरी मुलांची तारांबळ उडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन दिवसांपासून हिंगोली बसस्थानकातून एकही बस धावली नाही. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने मात्र अद्याप बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनाद्वारे प्रवासी जात आहेत. हिंगोली डेपोतील अनेक फेºया रद्द झाल्याने प्रवासी व शाळकरी मुलांची तारांबळ उडत आहेत.एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध योजना, उपक्रम राबविले जातात. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन, असे ठिक - ठिकाणी फलकही हिंगोलीत आगारात आहेत. परंतु कुठलाही बंद असो किंवा आंदोलन एसटीचीच नासधूस केली जाते. त्यामुळे सामान्य जनतेची ही जीवनवाहिनी संकटात सापडत चालली आहे. आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळाचे नुकसान होत आहे. मराठा आरक्षण मगणीसाठी पुकारलेल्या बंदमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पहाता-पहाता बससेवा अचानक बंद झाली. लांब पल्ल्यावरील बसेस तर मागील सात दिवसांपासून बंदच आहेत. बसचे होणारे नुकसान एसटी महामंडळाला परवडणारे नाही, त्यामुळे विविध मार्गावरून बस सोडण्यात आल्या नाहीत. शिवाय वरिष्ठ अधिकाºयांच्या तशा सूचनाही आहेत, अशी माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक एस. एन. पुंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली. परंतु बससेवा बंदमुळे स्थानक परिसरात शुकशुकाट आहे. विशेष म्हणजे मानव विकासच्या बसही बंद असल्याने शाळकरी मुलीही शाळेतपर्यंत पोहचू शकल्या नाहीत. यामुळे बस बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तर काही विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेकडे धाव घेत असल्याचे चित्र असून त्यांची फजिती होत आहे. हिंगोली आगारात एकूण ५४ बसेस आहेत. आंदोलनादरम्यान हिंगोली आगाराच्या चार बसेस फोडण्यात आल्या. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. बसचे नुकसान होत असल्यामुळे मात्र आगारातर्फे सर्वच मार्गावरील बसफेºया बंद केल्या आहेत. आंदोलकांनी बसवर लक्ष करताच हिंगोली आगारातील तीन शिवशाही बस तत्काळ बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवशाही बस सुरक्षित असून या बसचे नुकसान झाले नसल्याचे आगारातर्फे सांगण्यात आले. तसेच हिंगोली आगाराच्या अनेक बस बाहेरच अडकून पडल्याचे सांगितले जात होते. पंढरपूर येथे सोडलेल्या बसेस मात्र हिंगोली आगारात दाखल होत होत्या. मागील तीन दिवसांपासून बससेवा बंदमुळे मात्र प्रवासी वैतागले आहेत. बसेस कधी धावणार याबाबत विचारणा केली जात आहे. शाळकरी मुलांतूनही बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.हिंगोली आगारातील चार बसेसचे नुकसानतोडफोड करण्यात आलेल्या काही बसेसची हिंगोली आगारात किरकोळ दुरूस्ती केली जात असल्याचे दिसून आले. तसेच बससेवा रद्दमुळे मानव विकासने प्रवास करणाºया मुलींची गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.हिंगोली आगारात १२७ वाहक व ११६ चालक कार्यरत आहेत. परंतु मागील तीन दिवसांपासून बससेवाच बंद असल्यामुळे हिंगोली आगारातील अधिकारी कर्मचारी सेवा कधी सुरळीत होईल याच्या प्रतिक्षेत होते.हिंगोली आगाराचे १५ लाखांचे नुकसान४हिंगोली आगारात एकूण ५४ बसेस असून विविध मार्गाने धावणाºया बसफेºयातून महामंडळाला दरदिवशी साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न होते. शिवाय जादा सोडण्यात येणाºया बसमुळेही उत्पन्नात घट झाली आहे. मागील तीन दिवसांपासून बससेवा बंदमुळे हिंगोली आगारात बसेसच्या रांगा लागल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हिंगोली आगारातील बस कधी सुरू होणार याची चौकशी प्रवाशांतून केली जात होती. विभागीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून बस सुरू करण्याच्या सूचना मिळताच विविध मार्गावरून बस धावतील, असे प्रभारी आगारप्रमुख बी. बी. झरीकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.वसमत : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वसमत आगाराने खबरदारी म्हणून एस.टी. बस बाहेर सोडल्या नाहीत. दुसºया दिवशीही एकही बस आगारातून बाहेर गेली नाही. त्यामुळे बसस्थानकात शुकशुकाट होता. प्रवाशांचे मात्र हाल झाले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र वातावरण तापलेले आहे. आंदोलने होत आहेत. एस.टी.वर दगडफेक होण्याच्या घटना होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वसमतमध्ये मंगळवापासून बस बाहेर धावल्याच नाहीत. बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. खाजगी वाहतुकीच्या वाहनाद्वारे प्रवास करावा लागत आहे. शहरात अनेक खेड्यांतून येणाºया तसेच वसमत आगारातील बसद्वारे ये-जा करणाºया विद्यार्थ्यांच्या शाळेवरही परिणाम झाला असून सामान्य नागरिकांतूनही रोष व्यक्त केला जात आहे. बस बंदचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांना बसत आहे. महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. तालुक्यातील अनेक नागरिकांना शहरात बाजार ,कार्यालयीन कामकाज, दवाखाना,शेतकºयांनाही कामानिमित्त बाहेरगावी यावे लागते. परंतु सतत तीन दिवसांपासून बंद असलेल्या बससेवेमुळे गैरसोय होत आहे. खाजगी वाहनांची कमतरता आणि अडवणूक याचाही वेगळा फटका बसत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा