लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाविद्यालयीन परिसरात विनाकारण टवाळकी करत फिरणा-या पाच जणांना २८ डिसेंबर रोजी चिडमारपथकाने पकडले. यापुढे असा प्रकार करणार नाही, असे त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिल्याची माहिती पोउपनि प्रेमलता गोमासे यांनी दिली.हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालय परिसरात काही टवाळखोर काही कारण नसताना विनाकारण फिरत होते. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी दूरध्वनीवरून पोलिसांशी संपर्क केला. काही वेळातच चिडीमार पथकाने संबंधित विद्यार्थिनींची भेट घेऊन ‘त्या’ पाच जणांना ताब्यात घेतले.पथकातील पोउपनि गोमासे, मीरा बामणीकर, शेख शकील, सुनील अंभोरे, जीवन मस्के आदींनी कारवाई केली. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहित पडणाºया कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत ‘पोलीस काका व दिदी’ उपक्रमाअंतर्गत विशेष लक्ष दिले जात आहे. शालेय जीवनात निर्भयपणे राहावे, यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या संकल्पनेतून हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्यांदाच मुलींनी बेडरपणे पोलिसांना कळवून पाच जणांना अद्दल घडविली आहे. यापुढेही पोलीस हीच दक्षता दाखवतील, असे गोमासे म्हणाल्या.
हिंगोलीत पाच टवाळखोरांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:39 PM