लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर ८ जानेवारी रोजी विविध संघटना व युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. देशव्यापी संपात सहभागी संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. तर युवकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी शहरातील संविधान कॉर्नर येथे मुंडण आंदोलन केले. त्यामुळे ८ जानेवारी मंगळवार आंदोलनाचा दिवस ठरला.दोन दिवसीय देशव्यापी संपात हिंगोली येथे आॅल इंडिया पोस्टल एमप्लाईज युनियनच्या वतीने ८ जानेवारी रोजी घोषणाबाजी करत शासनाने विविध मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. संपात जिल्हाभरातील हजारो कर्मचारी सहभागी झाल्याचे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संपात सहभागी कर्मचाºयांमुळे टपाल खात्यातील कामकाज मंगळवारी दिवसभर बंद दिसून आले. परिणामी, कामानिमित्त येणाºयांना परत जावे लागले.सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच टपाल कार्यालयातील कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील युनियन संपात सहभागी झाले. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन त्वरीत लागू करण्यात यावी. ग्रामीण डाक सेवक कर्मचाºयांना श्री कमलेशचंद्र कमिटीचा अहवाल लागू करून त्यांना खात्यात समाविष्ट करून घ्यावे. खात्यातील रिक्त जागा त्वरीत भरा यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हाभरातील हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले होते.माकपचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या...शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाकर्त्यांनी प्रशासनास निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले की, हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकºयांनी हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, जिल्ह्यातील सर्व शेतकºयांचे ३० जून २०१८ पर्यंतचे कर्ज व वीजबिल माफ करावे, वनहक्क समित्यांची स्थापना करून दाखल केलेली प्रकरणे मंजूर करावी, १९९० पूर्वीपासून असलेल्या गायरान जमिनी नावे कराव्यात, स्वामीनाथन् आयोग लागू करावा, शेतकरी, शेतमजुरांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्ते प्रवेशद्वारावरच ठाण मांडून बसल्याने काहीकाळ जिल्हाधिकारी कार्यालयात येणाºयांना ताटकळावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांना रस्ता मोकळा द्यायला लावला. यावेळी मान्यवरांची भाषणेही झाली. निवेदनावर अंकुशराव बुधवंत, सुरेश काचगुंडे, उत्तम पुंडगे, अझर अली जामकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.आशा वर्कर व गटप्रवर्तक संपात सहभागी...देशव्यापी संपात आयटक, आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटना महाराष्टÑ राज्य सहभागी झाले होते. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आशा वर्कर व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस, स्वयंपाकी मदतनीस व असंघटित बांधकाम कामगारांना किमान १८ हजार रूपये मानधन द्यावे. व वेतनश्रेणी लागू करावी. तसेच केंद्र शासनाने प्रतिदिन ३५० रूपये जाहीर केले आहे. याबाबत अंमलबजावणी करण्यात यावी. गटप्रवर्तक महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व केंद्रीय कामगार संघटनेच्या मागणीनुसार दरमहा २० हजार रूपये वेतन देण्यात यावे. व कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे. यासह विविध मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.पोलीस अधीक्षकांना निवेदन - हिंगोली शहरातून भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पँथरगु्रप व स्वराज्य मित्रमंडळातर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी युवकांवरील तसेच कळमनुरी येथील राजू कांबळे यांच्यावरील दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख, रवींद्र वाढे, ज्योतिपाल रणवीर, सज्जाद पठाण, प्रल्हाद धाबे, सोमनाथ शेळके, बबन भुक्तर, कैलास सोनुने, विजय खाडे, अशोक खंदारे व पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.शिवसेनेतर्फे निवेदन - भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मिरवणुकीत सहभागी युवकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबतचे निवेदन शिवसेनेच्या पं. स. सदस्या सुमनबाई रामराव झुळझुळे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.आरक्षणासाठी जिल्हाधिकाºयांना निवेदनआॅल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांना ‘धनगर समाजाला एसटीचे आरक्षण’ मिळणे बाबत निवेदन देण्यात आले. निवसेदना म्हटले की, आदिवासी जीवन जगणाºया धनगर जमातीला १९४८ पासून त्यांच्या आरक्षणाकडे शासनाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे धनगर व धनगढ या शाब्दीक संभ्रमामुळे आरक्षण न देणे अन्यायकारक आहे. त्यामुळे धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण देण्यात यावे. अशी मागणी केली. निवेदनावर अॅड. के. के. शिंदे, अशोक नाईक, गजानन डाळ, वैजनाथ पावडे, शिवाजी वैद्य, शिवाजी ढाले, संभाजी कष्टे आदींच्या स्वाक्षºया आहेत.हिंगोलीत मुंडण आंदोलन१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त हिंगोली शहरातून पँथरगु्रप व स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी युवकांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले. हिंगोली शहर पोलिसांना रीतसर मिरवणुकीची परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी नाकारली असे युवकांनी सांगितले. शिवाय मिरवणूक काढण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याने त्यामुळे शांततेत मिरवणूक पार पडली. तरीसुद्धा पोलिसांनी युवकांवर गुन्हे दाखल केले. असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे ‘ए’ चे दिवाकर माने यांच्या नेतृत्वाखाली मुंडन आंदोलन करत युवकांवरील दाखल खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी किरण घोंगडे, अमोल पाईकराव, विकी काशिदे, राहुल खिल्लारे, बंडू नरवाडे, दीपक धांडे, आनंद खिल्लारे, विनोद खंदारे, सुनील ठोके यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलन-संपामुळे हिंगोली शहर दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:16 PM