लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली होती. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर कोणीच गुरे सांभाळण्यास तयार नसल्याने शेवटी गुन्ह्यांचा तपास सोडून गुरांचा एखाद्या धन्यासारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिसांवरच येऊन ठेपली आहे.गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत कत्तलीकडे घेऊन जाणाºया गुरांवर अनेकजण डोळा ठेवून आहेत. एखाद्या रस्त्याने जर गुरे घेऊन जाणारा ट्रक आढळला तर त्यांची माहिती थेट पोलिसांना दिली जाते. असलाच एक अनुभव २३ मार्च रोजी मध्यरात्री ताब्यात घेतलेल्या गुरांच्या माध्यमातून आला आहे. या प्रकरणी गुन्हा तर दाखल झालाच आहे. हे प्रकरण जरी कोर्टात गेले असले तरीही या गुरांना सांभाळायचा प्रश्न पोलिसांसमोर आ वासून आहे. या ठिकाणी गुरे सोडून घेण्यासाठी तर कोणी अद्याप आले नाही. मात्र काही सन्माननिय अपवाद वगळता या गुरांना चारा दाखवून फोटो काढणाºयांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील दोन तीन वगळता सर्वच गुरांना मार लागलेला असल्याने यांना सांभाळायचेही कोणी धाडसच करीत नसल्याचे चित्र आहे. तीन गुरांच्या जखमेत किडे पडल्याने पोलीस कर्मचाºयांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले आहेत. एका महिलेला देखरेखीसाठी ठेवलेले असले तरीही येता- जाताना कर्मचारी गुरांची पाहणी करत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासापेक्षा गुरांचा सांभाळ पोलिसांना चांगलाच अवघड होऊन बसला आहे. गुरांच्या सांभाळासाठी जि. प. पशुसंवर्धन विभाग, नगर पालिका, वळूमाता पैदास केंद्र, जिल्हा कृषी विभाग आदी विभागाचे दारे ठोठावूनही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.दरम्यान, जिल्ह्यात तीन शासकीय गोशाळेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहितीही पोलीस ठाण्यातूनच मिळाली आहे.तोंडी मागणी : राजकीय पुढाºयांना वेळच नाहीअनेकांकडून गुरांची तोंडी मागणी होत आहे. गुरांमधून काही फायदा नसल्याने की काय? एकाही राजकीय पुढाºयाने येथे येणे तर सोडाच साधी पोलिसांकडे गुरांची चौकशीही केली नाही. हे विशेष ! तर १२ जानेवारी रोजी पकडलेली १७ गुरे हत्ता येथील गोशाळेत आहेत. ती गुरे परत घेण्यासाठी त्या गुरांच्या मालकानेपोलिसांकडे अर्ज केला. त्यामुळे न्यायालयाने गुरे वापस करण्याचा आदेश दिला आहे. मात्र गोशाळा चालक तो पाळत नसून ३०० रुपयांप्रमाणे गुरांचा खर्च मागत आहे. तर गुरांचा मालक ५० रुपये प्रमाणे खर्च देण्यास तयार असला तरी ते देण्यास तयार नाहीत.पोलीस प्रशासनाच्या वतीने गुरांच्या साभांळासाठी पत्राद्वारे विविध विभागाकडे मागणी केली आहे. त्या विभागाकडून मिळणाºया उत्तराची प्रतीक्षा लागली आहे. काही विभागाने तर दुसºया विभागाची दारे दाखवलेली आहेत.सांभाळण्यास गुरे घ्या.. गुरे.. म्हणण्याची आली वेळकत्तलीकडे घेऊन जाणाºया गुरांचा प्राण वाचविण्यात पोलिंसाना यश आले असले तरीही त्यांचा सांभाळ करणे आता चांगलेच अवघड होऊन बसले आहे. या ठिकाणी फोटो काढून घेणाºयांची संख्या जास्त असली तरीही यांचा सांभाळ करतो असे म्हणणाºयांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे गुरे सांभाळण्याची व्यवस्था असणाºया विभागासह गोशाळेकडे धाव घेऊन सांभाळण्यास गुरे घ्या... गुरे.. असे म्हणण्याची वेळ आल्याचे पोउपनि तान्हाजी चेरले व पो. कॉ. प्रदीप जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर अनेकजण येथे मदतीसाठी धावत आहेत.