हिंगोली : तलवारीच्या धाकावर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की हिंगोली शहरातील इंदिरानगर येथील शेख युसूफ शेख पाशा यांची जमीन दोघांनी बळकविण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फिर्यादी यांना घरासमोर येऊन दमदाटी केली. याप्रकरणी शेख युसूफ यांनी हिंगोली शहर ठाण्यात तक्रार दाखल की, पंडीत वजीरराव घुगे व अमित पवार यांनी जिवे मारण्याची धमकी देत जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पंडीत घुगे यांनी तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात पंडित घुगे व अमोल पवार या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोनि उदयसिंग चंदेल यांनी दिली. पंडित वजीरराव घुगे हे बडतर्फ पोलीस कर्मचारी असल्याचेही पोनि चंदेल यांनी सांगितले.