लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीकडून नियोजन करण्यात आले असून रामलीला मैदानावर साफसफाईची कामे करण्यात येत आहेत.हिंगोली येथील प्रसिद्ध दसरा महोत्सवात दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दसरा प्रदर्शनात मोठे व लहान आकाश पाळणे तसेच प्रदर्शनात विविध दुकाने थाटली जाणार आहेत. रावणदहन व दसरा प्रदर्शन पाहण्यासाठी राज्य परराज्यातून हिंगोलीत मोठी गर्दी होते. धार्मिक व सांस्कृतिक तसेच क्रीडा स्पर्धा यासह विविध कार्यक्रमांचे नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी समितीमार्फत उपविभागीय कार्यालय हिंगोली येथे २६ सप्टेंबर रोजी ई-टेंन्डरींग ओपन करण्यात आली. त्यानुसार अंतिम निविदा यादीप्रमाणे दसरा प्रदर्शनातील मोठा झुला २३ लाख ३० हजार रूपये, लहान झुला २ लाख २० हजार, हॉटेल-पानटपरी १ लाख ८० हजार रूपये, आतषबाजी १ लाख ४८ हजार ५००, रामलीला ४ लाख ८१ हजार तर प्रदर्शनी ६ लाख ११ हजार याप्रमाणे अंतिम करण्यात आलेली रक्कम आहे. हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जोरात तयारी होत सुरुअसून रामलीला मैदान परिसरातील स्वच्छता मोहीम तसेच लाईटींग व प्रदर्शन उभारणीची कामे सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. दसरा महोत्सवानिमित्त क्रीडास्पर्धेचे नियोजन सुरू आहे.नागरिकांना विनामूल्य प्रवेशहिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रसिद्ध असून देशभरातील नागरिक दसरा पाहण्यासाठी हिंगोली येथे येतात. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही दसरा प्रदर्शनीत नागरिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून दसरा मैदान परिसरात जवळपास ३० सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमराद्वारे प्रत्येकांच्या हालचालीवर करडी नजर असणार आहे. तसेच दसरा मैदान व प्रदर्शनीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागातून दसरा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरी, किंवा इतर कोणत्याही घटना घडू नयेत, याबाबत खबरदारी घेतली जाणार आहे. यासह विविध नियोजन दसरा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंगोलीत दसरा महोत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:23 AM