शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

HSC Result 2024: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के, विज्ञान शाखेची टक्केवारी सर्वाधिक

By विजय पाटील | Published: May 21, 2024 4:09 PM

मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२५ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे.

हिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून १२ हजार ६४७ विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले असून यापेकी ११९९ जणांनी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.६६ टक्के निकाल लागला आहे.

हिंगोली जिल्ह्यात विज्ञान शाखेतील ७२८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज केला होता. यापैकी मुले ३९०५ व मुली ३३०४ असे ७२०९ जण परीक्षेला बसले. यातील ७०४१ उत्तीर्ण झाले. यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२५ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे. एकूण ९७.६६ टक्के निकाल लागला आहे. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातून २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला.२३० जणांनी परीक्षा दिली. २०८ जण उत्तीर्ण झाले. यात १४५ मुले तर ६१ मुलींचा समावेश आहे. येथेही मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.८७ टक्के तर मुलांचे ९३.८४ टक्के आहे.

पुरवणी परीक्षेतही यशपुरवणी परीक्षेतही विज्ञान शाखेतून १०३ जण उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ५३.०९ टक्के आहे. कला शाखेत २४० पैकी १२६ उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ६१.०८ टक्के आहे. किमान कौशल्यावर आधारितचे ८ पैकी ५ उत्तीर्ण झाले असून प्रमाण ६२.५० टक्के आहे. वाणिज्य शाखेत ९ पैकी ४ जण उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ४४.४४ टक्के आहे.

कला शाखेत मुली अव्वलहिंगोली जिल्ह्यात कला शाखेच्या ५ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला. यातल ५६०८ परीक्षेला बसले होते. यापैकी ४७२८ उत्तीर्ण झाले. यामध्ये २ हजार ६०२ मुले तर २१२४ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.६९ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.६५ टक्के असून दोन्हींमध्ये दहा टक्क्यांचे अंतर आहे. मुलींची कामगिरी जास्त सरस ठरली आहे. एकूण निकाल ८४.२७ टक्के लागला.

वाणिज्य शाखेचा निकाल ९४ टक्केवाणिज्य शाखेतील ७२२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यापैकी ७१७ जणांनी परीक्षा दिली. तर ६७४ जण उत्तीर्ण झाले. यात ३३५ मुली तर ३३९ मुले आहेत. यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.५४ तर मुलींचे ९७.६९ टक्के एवढे आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालHingoliहिंगोली