लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ३१ जुलै रोजीचे ६ वाजल्यापासून ते १३ आॅगस्ट रोजीचे २४ वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ (१) (३) चे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाºयांव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. भांडणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकला करणाºयांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी गैरवर्तन केल्यास गुन्हा दाखल होईल.
हिंगोली जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी कलम लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:32 AM