हिंगोली : आज सकाळी 9:28 वाजता जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का पांगरा शिंदेसह येथे जाणवला. यासोबतच सिरळी, खाबाळा, रजवाड़ी, पिंपळदरी, सोनवाडी, आमदरी, राजदरी, कंजारा या गावासह इतर ठिकाणी सर्वात मोठा धक्का जाणवला आहे. मुख्यतः यात वसमत, औढा, कळमनुरी या तालूक्यातील गावाचा समावेश आहे. कुठल्या ही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती वसमत तहसीलदार यांनी दिली आहे.
पांग्रा शिंदे येथे गेल्या काही महिन्यापासून गूढ़ आवाजाचे सत्र सुरु आहे. परंतु, हा आवाज कशाचा आहे या अद्याप भूगर्भ विभागाला शोध लागलेला नाही. त्यामुळे हा प्रकार काय आहे याचे कोडे कायम असून पांग्रा शिंदे सह इतर गावामधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरणात आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त गावात धामधुम सुरु असताना सकाळी 9:28 वाजता पांग्रा शिंदे सह शिरळी, वापटी, कूपटी, राजवाड़ी, खाबाळा, पिंपळदरी, सोनवाडी, आमदरी, राजदरी, कंजारा या गावासह इतर काही गावांना जमिनीत गूढ़ आवाज होऊन सौम्य धक्का जाणवला आहे. यात वसमत, औढा, कळमनुरी या तालूक्यातील गावाचा समावेश आहे. गूढ़ आवाजाची तीव्रता मोठी होती. त्यामुळे सिरळी येथे ग्रामस्थ घरा बाहेर धावत आले होते .या घटनेने या परीसरातील नागरिक घाबरलेल्या अवस्थेत आहेत.
गेल्या कही महिन्या पासून गूढ़ आवाज नित्याचा बनला आहे .काही महिन्यापूर्वी नादेड येथील स्वामी रामाचंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ च्या संशोधन पथकाने भेट देऊन माती नमूने घेतले होते .त्यातुन देखील काहीच निष्पन्न झाले नाही व भूगर्भ शास्त्रज्ञ यांना देखील अद्याप गूढ़ आवाजाचा शोध लागला नाही. त्यामुळे या आवाजाचे रहस्यमय बनले आहे.
वसमत तहसीलदार ज्योति पवार यांना संपर्क साधला असता त्यांनी गूढ़ आवाजातून हा धक्का जाणवल्याचे सांगितले. तसेच याची भूकंप मापक केंद्रातून माहिती घेण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे पथक पाठविल्याची माहिती दिली.