लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला.जिल्ह्यातील विविध भागात सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. दुपारनंतर मात्र पावसाचा वेग वाढला व गारपीटही सुरु झाली होती. दुसºया दिवशी वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील बहुतांश गावाला पावसाने चांगलेच झोडपले. कळमनुरी तालुक्यातील घोडा कामठा, येहळेगाव तु आदी परिसरातील गहू, हरभरा, टोमॅटोचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले. हातातोडांशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकºयांची यंदाही चिंता वाढली आहे. येलकी येथे वादळी वाºयासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतकरी मागील चार ते पाच वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेत सापडला आहे. यंदाही स्थिती भंयकर असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील अवधूत शिंदे यांनी अर्ध्या एकर मध्ये लागवड केलेल्या मिरचीचे ३० ते ४० हजार रुपयाचे नुकसान झाले. महसूल विभागाने अद्याप पंचनामा केलेला नाही. नुकसान भरपाईची मागणी केली आहे.कौठा परिसरात तारांबळकौठा : परिसरात तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असून सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता जोरदार मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. कौठा, खुदनापूर, बोराळा, किन्होळा आदी भागात साधारणत: अर्धातास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तर गारांसह पाऊस झाल्याने शेतातील उभी ज्वारी, हरभरा, गहू व नेमकाच आंब्याला आलेल्या मोहोरचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय गावातही वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. अगोदरच संकटात असलेला शेतकरी या अवकाळी पावसाने पुन्हा संकटात सापडला आहे.तहसीलदारांकडून पाहणीसेनगाव : बन, बरडा परिसरात रविवारी गारपीट झाली. या गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सोमवारी तहसीलदार वैशाली पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.तालुक्यात रविवारी अवकाळी पावसाने तुर, हरभरा, गहू या पिकांना झोडपून काढले. तालुक्यातील बन, बरडा शिवारात अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाला.यामुळे शेतातील उभे पिके आडवी झाली. हरभरा,गहू या पिकासह फळबाग शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पाहणी करून पंचनामे केले आहेत. या परिसरात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.दांडेगाव येथे गारपीटवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे साडे चार ते पाच वाजेदरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला तर आठ ते दहा मिनिटे गारपीट झाली आहे. दांडेगाव परिसरात मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे चार ते पाच वाजेदरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला तर आठ ते दहा मिनिटे जोरदार गारपीट झाली आहे. जोरदार पाऊस व गारपीट झाल्याने गहू आडवा झाला तर काढणीस आलेले हरभरा पिकांचे देखील भरपूर नुकसान झाले आहे. निसटलेल्या केळीचेही नुकसान झाले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.वसमत : येथे सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी इतरत्र पाऊस असताना वसमतमध्ये मात्र ऊन होते. सोमवारी पावसाने हजेरी लावली तालुक्यातील कुरूंदा परिसरात गारांचा पाऊस झाला.वसमत शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी पाचनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. साधारण १० ते १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुरूंदा परिसरात मात्र गारांसह पाऊस झाला. रविवारी वसमत परिसरात हजेरी न लावलेल्या पावसाने मात्र सोमवारी हजेरी लावून कसरच दूर केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रस्त्यावर पडलेल्या गारा बच्चे कंपनी वेचून आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे दिसून आले.
दुसºया दिवशीही हिंगोली जिल्ह्यात गारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:17 AM