कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक ग्रामविकास मंत्रालयाने ९ जानेवारी रोजी काढले आहे.जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हांतर्गत बदली २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. या सुधारीत धोरणानुसार संगणकीय पद्धतीने यावर्षीची बदली प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांचे शाळानिहाय मॅपिंग होणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्व शाळा संचमान्यतेच्या कामामध्ये मग्न आहेत. शालेय क्रीडा व क्रीडा विभागाद्वारे सर्व शाळांना सरल प्रणालीद्वारे आॅनलाईन पद्धतीने संच मान्यता पूर्ण करण्यासाठी शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती, शाळा व केंद्र प्रमुखांच्या लॉगीनवरून फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. १६ जानेवारीपासून लगेचच जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. ही कार्यवाही शाळा केंद्रप्रमुख स्तरावरून तातडीने व दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण केली जाणार आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण विभागाच्या यंत्रणेला निर्देश देण्याची सूचना परिपत्रकात नमूद आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया विहित मुदतीत होणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये हलगर्जी करणाºया कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोेजनाची प्रक्रिया १५ जानेवारीपूर्वी करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास व जलसंधारण विभागाने अवर सचिव प्रि.श. कांबळे यांनी ९ जानेवारी रोजी परिपत्रक काढले आहे. अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र यानुसार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.अनेक दिवसांपासूनच्या चर्चेला विरामगेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या बदल्यांवरून चर्चा होत होती. शिक्षक बदल्यांच्या धोरणाला शिक्षकांचा विरोध होता. त्याविरुद्ध अनेक संघटनांनी एकत्र येत मोर्चेही काढले होते. विशेष म्हणजे यात ज्येष्ठतेवर आधारित होणाºया बदलीमुळे सर्वच शिक्षक आॅक्सिजनवर राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच आपली बदली होणार असल्याचे दिसून येत आहे. तरीही शासनाला याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास बराच काळ लागला होता. त्यामुळे उन्हाळ्यातच बदल्यांबाबत आदेश येतील, असे वाटत असताना मध्येच ते धडकल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:30 AM
जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक ग्रामविकास मंत्रालयाने ९ जानेवारी रोजी काढले आहे.
ठळक मुद्देग्रामविकास मंत्रालयाचा आदेश धडकला : सुधारित धोरणानुसार होणार कारवाई