हिंगोली : संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडास्पर्धेचा आज समारोप झाला. सर्वात जास्त आकर्षण ठरलेल्या कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील किनवट, धारणी व कळमनुरी येथील संघाने प्रथम क्रमांकाने विजेतेपद पटकावून बाजी मारली.
शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडास्पर्धेचे आज सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आले.यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आ. तानाजी मुटकुळे, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड, मुख्याधिकारी रामदास पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदणे, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मागील तीन दिवसांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडास्पर्धा येथे सुरु होत्या. आज समारोपाच्या दिवशी विजेत्या स्पर्धकांना व खेळात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. विभागीय स्पर्धेत कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील किनवट, धारणी व कळमनुरी येथील संघाने प्रथम क्रमांकाने विजेतेपद पटकावून बाजी मारली. तर मुलांच्या १४ वयोगटात कबड्डी स्पर्धेत पांढरकवडा येथील संघाला उपविजेता घोषीत करण्यात आले. स्पर्धेत वैयक्तिक व सांघीक खेळ घेण्यात आले.