लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सोळावा नांदेड परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळावा २०१८ करीता पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानपथक राणा, राणी आणि मॅक्स या श्वानांची लातूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. स्पर्धेत हिंगोली श्वान पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली असून स्पर्धा जिंकली.विविध अवघड गुन्ह्यांचा उलगडा करणे, आरोपींपर्यंत पोलिसांना पोहचविणे यासह अनेक कारवाईत श्वानपथकाद्वारे शोध घेतला जातो. हिंगोली पोलीस दलातील श्वानपथक महत्त्वाची भुमिका बजावत आहे. विविध गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना या श्वानपथकाची मोठी मदत होते. नांदेड परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळावा २०१८ करीता पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानपथक राणा, राणी आणि मॅक्स या श्वानांची लातूर येथे होणाºया स्पर्धेसाठी निवड झाली. लातूर येथे २७ ते २८ जुलै रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत हिंगोली येथील श्वानपथकाने बाजी मारली आहे. पोउपनि तथा श्वान अध्यापक म्हणून आर. एन. रायमळ हे काम पाहातात. तर एएसआय व्ही. जे. माडेवार, अर्जुन यादव, ए. डी. डोईजड, लिंबाजी सदावर्ते आदींची टीम श्वानपथकाचे कामकाज पाहतात.सिद्धेश्वर येथील खूनाचा ‘मॅक्सने’ केला उलगडा४आरोपींना पकडण्यासाठी श्वानपथकाचे महत्व मोठे आहे. सिद्धश्वर येथील खुन प्रकरणातील आरोपीची ‘गुन्हे शोध पथक’ मॅक्स या श्वानाने लोखंडी रॉडचा वास घेऊन ओरोपीची ओळख पटविली होती. तर लातूर येथील स्पर्धेत गुन्हेशोधकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. ‘मादक पदार्थ शोधक’ राणा आणि राणी या श्वानाने ६ ठिकाणी पोलिसांना मदत केली. राणा या श्वानाने आतापर्यंत दोन गोल्डमेडल तर एक सिल्वर पदक पटकाविलेले आहे. ‘स्फोटक पदार्थ शोधक’ राणी श्वानाने १ गोल्ड, १ सिल्वर व १ कास्यपदक.
हिंगोलीच्या श्वानपथकाची लातूरात बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:15 PM