शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

हळदीच्या वाहनांच्या हिंगोली मोंढ्यात रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:13 AM

जिल्ह्यासह परजिल्ह्यातही प्रसिद्ध हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा हळदीची आवक वाढण्यास प्रारंभ झाला असून बुधवारी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास ३६५ वाहनांतून ७ ते ८ हजार क्विंटल हळद विक्रीस आल्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत या मालाची मोजणीच चालणार आहे.

ठळक मुद्देसात ते आठ हजार पोत्यांची आवक : भावही सर्वसाधारणच, खरिपाच्या तोंडावर विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यासह परजिल्ह्यातही प्रसिद्ध हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा हळदीची आवक वाढण्यास प्रारंभ झाला असून बुधवारी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास ३६५ वाहनांतून ७ ते ८ हजार क्विंटल हळद विक्रीस आल्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत या मालाची मोजणीच चालणार आहे.हिंगोली जिल्ह्यात सिंचनाच्या पट्ट्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. काही दिवसांपासून हळदीच्या भावात हजार रुपयांच्या पटीत चढ उतार होत आहे. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. भाव वाढले म्हणून बाजारात हळद आणली की, भाव घसरत आहेत.बुधवारी हळदीचे बिट होणार असल्याचा संदेश शेतक-यांना मिळाल्यामुळे मंगळवारी रात्रीच अनेकांनी वाहने भरून आणली. मात्र त्यांना मोंढ्यात जावू दिले जात नाही. बुधवारी सकाळपासून नाव व वाहन नोंंदणी केल्यानंतर आत सोडण्यास प्रारंभ झाला. जवळपास ३६५ वाहनांची नोंद झाली होती. या सर्व वाहनांतील मिळून सात ते आठ हजार क्विंटल माल असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या मालाचे बिट दुपारनंतर सुरू झाले. आज साडेसहा ते साडेसात हजारांपर्यंतचा भाव शेतकºयांना मिळाला एकाच दिवसात मालाचे बिट होणेच शक्य नाही. काही मालाची बिट उद्या करावी लागणार आहे. तर बाजार समितीत अडीच ते तीन हजार क्विंटल मालाच्या मोजणीचीच प्रक्रिया एका दिवसात करणे शक्य असल्याने शुक्रवारपर्यंत मोजणी चालू शकते. त्यामुळे काही शेतकºयांना दोन दिवसांचा मुक्काम करणे क्रमप्राप्त आहे....तर बिट सोमवारीआगामी खरीप पेरण्यांच्या पार्श्वभूमिवर हळदीची आवक वाढत आहे. मात्र शुक्रवारपर्यंत आजच्या हळदीचीच मोजणी झाल्यास पुढील सोमवारीच पुढचे बिट होईल, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.तुरीची खाजगी विक्री : आवक तिप्पटनाफेडच्या हमीभाव केंद्रावर तुरीची खरेदी करणे बंद झाल्याची वार्ता येताच शेतकºयांनी खाजगी बाजारात तुरीची विक्री करण्यासाठी आज घाई केल्याचे चित्र होते. बोनससह नाफेडचा दर ५४00 रुपये एवढा पडत असताना खाजगी बाजारात मात्र तूर ३९00 ते ४१५0 रुपयांपर्यंत तूर शेतकºयांना विकावीलागली. जवळपास हजार ते दीड हजार क्विंटल तुरीची आवक झाल्याचा अंदाज आहे. शेतकºयांना तुरीमागेही हजारांचा फटका बसत असून हमी भाव केंद्रावर तूर येत नसल्याचे सांगणाºयांनी ही तूर कुठून येत आहे, याचे रहस्य उलगडण्याची गरज आहे.‘कमी दर मिळालेल्या शेतकºयांना अनुदान द्या’हिंगोली : शासनाने स्थापन केलेल्या हमीभाव केंद्रावर माल विकू न शकलेल्या शेतकºयांना किमान आधारभूत किमतीपेक्षाही हजार ते दीड हजार रुपये कमी भावाने माल विकावा लागला. अशांना सरसकट प्रतिक्विंटल हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तूर ५४५0, चना-४४00 तर सोयाबीनला ३२५0 रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला होता. मात्र नाफेडच्या दिशाहीन धोरणामुळे शेतक-यांचा मालच पूर्णपणे खरेदी केला गेला नाही. हजारो शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत कमी भावाने माल विकावा लागला. त्यांना अनुदान देण्याची मागणी आम आदमी पार्टीचे गोपाल ढोणे, राजीव पवनकर, पांडुरंग कान्हे, दुर्गादास खर्जुले, गजानन हाके, नंदकिशोर अग्रवाल आदींनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी