शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

धक्कादायक ! लोखंडी शिडी उच्चदाब विद्युतवाहिनीत अडकल्याने दोघांचा जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 6:03 PM

मंगल कार्यालय गेटचे काम करत असताना झाली दुर्घटना  

वसमत (जि.हिंगोली) : परभणी रोडवर नव्याने होत असलेल्या मंगल कार्यालयाची कमान बसवत असताना लोखंडी शिडी ११ केव्ही उच्चदाब विजतारांमध्ये अडकल्याने दोघांचा जळून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. 

वसमत-परभणी रस्त्यावर श्रीकृष्ण मंगल कार्यालय नव्याने सुरू होत आहे. १ जानेवारी रोजीच मंगल कार्यालयाचे उद्घाटन झाले. या मंगल कार्यालयाच्या गेटची लोखंडी कमान बनवण्याचे काम मंगल कार्यालयाचे दोन कर्मचारी करत होते. कमान बसवण्यासाठी चाके असलेली लोखंडी शिडी होती. ही शिडी घेवून दोन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून काम केले. दुपारी शिडी परत मंगल कार्यालयात ढकलत घेवून येत असताना ११ केव्ही विज तारांना शिडीचे वरचे टोक अडकले व हायहोल्टेज विद्युत प्रवाहाने दोघेही जागीच ठार झाले. हायहोल्टेज विज प्रवाहांमुळे दोघांचे मृतदेह पूर्णतः जळाले होते. 

ही घटना लक्षात येताच जवळपासच्या नागरिकांनी विद्युत विभागास कळवले. यात विलास गिरमाजी पतंगे (५५, रा.वसमत)  व सिद्धार्थ केशव वाघमारे (३५, रा.गणेशपूर ता.वसमत) असे दुर्घटनेत ठार झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंदखडके व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीelectricityवीज