लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित १७ ते २० जानेवारीदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्टÑीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.३१ वर्षांपासून सुरू असलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्टÑीय व्याख्यानमाला आहे. या व्याख्यामालेत तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महामानावांच्या विचारांचा वारसा चालवला जातो. व्याख्यानमालेसाठी यापूर्वी अनेक नामवंतांनी व्याख्याने दिली आहेत. यंदा भालचंद्र मुनगेकर, डॉ.अर्पना कोतापले, प्रा.डॉ.लांडे, प्रा.वाहुळे, प्रा.वसंत पुरके यांना पाचारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्याख्यानमालेचा लाभ धेण्याचे आवाहन प्रा.विक्रम जावळे, वाय.बी. मुळे, अॅड.के.जे. आरगडे, प्राचार्य बाबासाहेब इंगोले यांच्यासह बौद्ध सांस्कृतिक मंडळाद्वारे केले आहे.
हिंगोलीत व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:41 AM