हिंगोली : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात नंतर सेनेने पाय पसरले. मात्र मागच्या वेळी काँग्रेसने गड राखत खा.राजीव सातव विजयी झाले होते. यावेळी काँग्रेसचे सुभाष वानखेडे व शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. १९९६ पासून या मतदारसंघात सेना व काँग्रेस आलटून पालटून निवडून येत आहे. यावेळी सेनेचे हेमंत पाटील यांनी हेच गणित पक्के करत शानदार विजय मिळवला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीनंतर शिवसेनेच्या हेमंत पाटील पहिल्या फेरीपासूनच मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करत होते.
मतदारसंघः हिंगोलीविजयी उमेदवाराचे नावः हेमंत पाटीलपक्षः शिवसेना
हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण १७.३२ लाख मतदार असून यंदाच्या निवडणुकीत .६६.६८ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे खा.राजीव सातव यांनी ४ लाख ६७ हजार ३९७ मतांसह विजय साकारला होता, तर शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार ७६५ मतं मिळाली होती.