लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी हिंगोलीत १ आॅगस्ट रोजी तिसरी नियोजन बैठक पार पडली. यामध्ये साहित्य वाटप, मुंबई मोर्चाचे नियोजन व तालुका पातळीवर प्रचाराचे नियोजन करण्यात आले.येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी जिल्हास्तरीय बैठक झाली. यावेळी गाव पातळीवर प्रचार करण्यासाठी साहित्याचे वाटप केले. संबंधीत सर्कलच्या मराठा समाजातील जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे. वसमत व सेनगाव येथे बैठक व जनजागृती कार्यक्रम सुरू झाला आहे. तसेच कळमनुरीत ३ आॅगस्ट, वारंगा, डोंगरकडा व परिसरातील गावांसाठी २ आॅगस्ट रोजी बाळापूर, जवळा बाजार व परिसरातील समाज बांधवांसाठी ४ आॅगस्ट रोजी बाराशिव मंदिर, हनुमान मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले आहे.अशी राहील पार्किंग व्यवस्थामुंबई येथे आझाद मैदानावर आयोजित मराठा मोर्चासाठी हिंगोली जिल्ह्यातून समाज बांधवांसाठी पनवेल रेल्वे स्टेशन व खारघर रेल्वे स्टेशन या दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच लोकल रेल्वेने प्रवास केल्यास जिजामाता उद्यानानजीक दादर रेल्वे स्टेशन, भायखळा रेल्वे स्टेशन व रे- रोड ही स्थानके मोर्चाचे ठिकाण असलेल्या जिजामाता उद्यानानजीक आहेत.मोर्चेकºयांसाठी सूचनामुंबई क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हास्तरावर काही सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्याने रेनकोट व छत्री सोबत ठेवणे, कोणत्याही अनोळखी वस्तूस हात लावू नये, संशयास्पद वस्तू आढळल्यास स्थानिक पोलिसांना तशी माहिती देणे. राज्यातील ५७ मोर्चाप्रमाणे हा मोर्चाही मूक मोर्चा असणार आहे.५ आॅगस्टला मोटारसायकल रॅलीशहरात ५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यापासून मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी ११ वाजता या ठिकाणी बैठक होणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत एक हजार मोटारसायकलची नोंदणी झाली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीची हिंगोलीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:21 AM