शहरं
Join us  
Trending Stories
1
Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
2
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
3
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
4
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
5
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
6
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
7
Kojagiri Purnima 2024: कोजागरीला गजपूजाविधी व्रत केल्याने होते ऐश्वर्यप्राप्ती; जाणून घ्या विधी!
8
Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या
9
चीन आणि तैवानमध्ये संघर्ष वाढला; १५३ फायटर जेट विमानं तैनात, युद्धासाठी आव्हान
10
Vastu Shastra: श्रीमंतांच्या घरात हमखास सापडतील 'या' सात वस्तू; धनवृद्धीसाठी आजच आणा!
11
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
12
Aadhaar Card मधील मोबाइल नंबर ऑनलाइन बदलता येतो का? काय आहे नंबर बदलण्याची प्रक्रिया
13
कौतुकास्पद! सहावीत नापास झाली, पण हार नाही मानली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात IAS
14
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका
16
सावधान! गर्लफ्रेंडची कॉल हिस्ट्री, चॅट्स पाहताय? बॉयफ्रेंडची अशी होतेय फसवणूक...
17
अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग
18
आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 
19
बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
20
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी

हिंगोली नगरपालिकेची सरस कामगिरी; सौंदर्यीकरण व स्वच्छतास्पर्धेत राज्यात तिसरी

By विजय पाटील | Published: April 20, 2023 5:41 PM

जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली.

हिंगोली : महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत अ व ब न.प. गटात हिंगोली नगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. विविध स्पर्धांमध्ये सातत्याने हिंगोली पालिकेची कामगिरी सरस ठरत असून या पुरस्काराच्या रुपाने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे.

जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली.  ही स्पर्धा ही सहा गटामध्ये विभाजित केली होती. यामध्ये अ आणि ब वर्ग नगर परिषद मिळून एक गट केला होता. त्यामध्ये हिंगोलीने बाजी मारली. महाराष्ट्र राज्यामधून तृतीय क्रमांक पटकावला असून सन्मान पत्र व पाच कोटी रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,  प्रधान सचिव नगर विकास विभाग सोनिया सेठी,  आयुक्त तथा संचालक,  किरण कुलकर्णी आदींच्या  हस्ते प्रदान करण्यात आला. 

प्रशासकीय कामगिरीत राज्यात द्वितीय नगर विकास विभाग दिनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या विविध कमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अ आणि ब वर्ग नगर परिषद गटामध्ये हिंगोली पालिकेने द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मुख्याधिकारी अरविंद मुंढे, शहर अभियंता . रत्नाकर अडसिरे, स्वच्छता निरिक्षक बाळू बांगर, शहर समन्वयक आशिष रणसिंगे, शहर अभियान व्यवस्थापक  पंडित मस्के आणि  प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.

कामगिरीत सातत्यस्वच्छता अभियानात हिंगोली नगरपालिकेने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात रामदास पाटील, अजय कुरवाडे यांनी निर्माण केलेल्या परंपरेत मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी भर घालत कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्यामुळे हा आणखी एक पुरस्कार मिळाला. शहरातील नागरिकांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम या बळावर पालिकेला हे दोन पुरस्कार मिळाल्याचे मुंढे यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाHingoliहिंगोली