शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

‘माझी वसुंधरा’ उपक्रमात हिंगोली पालिका राज्यात अव्वल; मिळाले ५ कोटींचे पहिले बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 3:26 PM

हिंगोली नगरपालिकेला यापूर्वी स्वच्छता अभियानातील विविध स्वरुपाचे तीन पारितोषिके मिळाली आहेत.

ठळक मुद्देहिंगोली पालिकेला राज्यस्तरीय पहिले बक्षीस जाहीर झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

हिंगोली : नगरपालिकेने स्वच्छता अभियानासोबतच वनराजी, प्रदूषण नियंत्रण आदी बाबींमध्ये केलेल्या कामाचे फळ आता मिळत असून यंदाचा माझी वसुंधरा उपक्रमाचा राज्यस्तरीय पहिला पुरस्कार आज ऑनलाईन मिळाला. यात पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

ऑनलाईन बक्षीस वितरण कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, संजय सोनवणे, सचिव मनीषा म्हैसेकर आदींची उपस्थिती होती. राज्यातील २२२ नगरपालिकांनी या अभियानात सहभाग नोंदविला होता. त्यातून पहिले बक्षीस पटकावण्याची किमया हिंगोली पालिकेने साधली आहे.

हिंगोली नगरपालिकेला यापूर्वी स्वच्छता अभियानातील विविध स्वरुपाचे तीन पारितोषिके मिळाली. घरकुल योजनेतही पुरस्काराचा मानकरी ठरली. यात आता माझी वसुंधरा अभियानात प्रथम आल्याने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, नगरसेवक बिरजू यादव, आरेफ लाला, चंदू लव्हाळे, श्याम माळवटकर, स.सनोबर, बाळू बांगर, ठाकूर यांच्यासह न.प.चे कर्मचारी हजर होते.

फटाके फोडून जल्लोषहिंगोली पालिकेला राज्यस्तरीय पहिले बक्षीस जाहीर झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बांगर, चव्हाण, कुरवाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मागील चार ते पाच वर्षांत झालेल्या विविध कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यातच इतर उपक्रमांमध्येही पालिका मागे नाही. त्यामुळे विविध प्रकारची बक्षीसे दरवर्षी मिळत आहेत. त्यामुळे विकासालाही हातभार लागत आहे. काही बक्षीसांमध्ये निधीही असल्याने त्याचा शहराच्या विकासासाठी उपयोग होत असल्याचे बांगर व चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीenvironmentपर्यावरण