यामध्ये नागरिकांकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, शॉपिंग सेंटर दुकान भाडे, मोबाइल टॉवर जागा भाडे इत्यादी वसुली करण्याकरिता झोननिहाय वसुली पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. यासाठी नागरिकांना आपल्याकडील करपात्र कराची थकीत रक्कम तत्काळ या वसुली मोहिमेतील कर्मचाऱ्यांकडे जमा करून रीतसर पावती घ्यावी. जे नागरिक सदर वसुली मोहीममध्ये करपात्र रक्कम भरून सहकार्य करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्यामध्ये मालमत्ता जप्त करून मालमत्तेचा लिलाव करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, संबंधिताचे न.प. शॉपिंग सेंटरमधील दुकानास सिल लावणे, थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणे तसेच शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांचे नावे बॅनरद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी आपल्याकडील करपात्र रक्कम, थकीत रक्कम नगर परिषद कार्यालयाकडे जमा करावे, असे आवाहन हिंगोली न.प. तर्फे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले आहे.
हिंगोली न.प. तर्फे वसुली मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:38 AM