लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील महावितरण कार्यालयासमोर ७ जानेवारी रोजी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी एकदिवशीय संप पुकारण्यात आला. संपात जिल्हाभरातील ५०० च्या वर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.महाराष्टÑ राज्य शासनाच्या अधिकारातील चारीही वीज कंपनीतील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी सोमवारी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. महावितरण कंपनीमध्ये प्रचलित शाखा कार्यालयाची वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये महावितरण कंपनीचे प्रशासन मोठ्या प्रमाणात बदलाच्या विचारात आहे. नुकतेच त्यांनी भांडुप, वाशी, कल्याण व पुणे शहर या विभागात पहिल्या टप्यात प्रस्तावित बदल करण्यासंदर्भातील आदेश पारित केले आहेत. सदरील विभाग महावितरण कंपनीच्या एकूण महसूलाच्या ५० टक्केपेक्षा जास्त महसूल वीजबिलांच्या अनुषंगाने देत असतो. म्हणून सदरील ग्राहकांना योग्य नियमित सेवा मिळावी अशी अभियंते व कर्मचाºयांची भावना आहे. परंतु नवीन प्रस्तावित बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शाखा कार्यालये बंद केली असून पहिलेच कमी असलेली कर्मचारी संख्या अजून अंदाजे ५० टक्के कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकसेवेवर निश्चित परिणाम होईल. संघटनेने सदर प्रस्तावावर सूचना केल्या होत्या. परंतु याबाबत विचार करण्यात आला नसून अभियंते, कामगार व अधिकाºयांत नाराजी आहे. यासह विविध प्रश्न असून ते मार्गी लागावेत यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर केले आहे. आ. मुटकुळे यांनी उर्जामंत्री चंद्रशेख बावनकुळे व राज्य उर्जामंत्री मदन येरावार यांच्यासोबत चर्चा करण्याचे निवेदन दिले आहे.
हिंगोलीत एकदिवसीय लाक्षणिक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:09 AM