लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता शिष्यवृत्ती योजनेची माहिती आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागातर्फे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर आॅनलाईन पद्धतीने भरण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु पोर्टलमधील वारंवार बिघाड डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची माहिती अद्याप भरली गेली नाही. विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. परंतु आता शिष्यवृत्तीसाठी आॅफलाईन पद्धतीने माहिती स्विकारली जाणार आहे. शिवाय या संदर्भात संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी विविध शिष्यवृत्ती योजनेची माहिती कशाप्रकारे भरून घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हिंगोली व वसमत येथे कार्यशाळा घेण्यात येणार असून याबाबत संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले असून मुख्याध्यापकांनाही सूचना देण्यात आल्याचे जि. प. समाजकल्याण विभागाने सांगितले. कार्यशाळेत आॅफलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती बाबत माहिती दिली जाणार आहे.हिंगोली : ...तर मुख्याध्यापक जबाबदार२०१७-१८ या वर्षातील शिष्यवृत्ती करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी कार्यशाळेस उपस्थित राहणे बंधनकार असल्याचे जि. प. समाजकल्याण अधिकारी गीता गुठ्ठे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. विद्यार्थी वंचित राहिल्यास मुख्याध्यापकजबाबदार राहतील. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मॅट्रीकपुर्व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, माध्यमिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना पोर्टलवरून वगळून आफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे हिंगोली तालुका, सेनगाव, कळमनुरी व औंढा तालुक्यांची ११ जानेवारी रोजी तर वसमतची १५ जानेवारी रोजी वसमत येथील पं. स. येथे कार्यशाळेचे आयोजन केले जाणार.
हिंगोलीत आॅनलाईन शिष्यवृत्ती आता ‘आॅफलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:38 PM