हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार बोधेमवाड हे कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मात्र ७ मे रोजी त्यांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. त्यांच्या नाकावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. मात्र उपचार सुरू असतानाच २४ मे रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मयत जमादार बोधेमवाड हे दाताडा (ता.कंधार) येथील रहिवासी होते. परभणी पोलीस दलात ते भरती झाले होते. त्यांनतर ते हिंगोली पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांनी वसमत, कुरुंदा, हट्टा, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फोटो :