हिंगोली : मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेत पहिल्या टप्प्यात दीड हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजूर झाले असून त्यापैकी ११२६ जणांनी रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. यातील २४ जणांचे सौर कृषीपंप प्राप्त झाले आहेत. मात्र सीम नसल्याने ते अजून सुरू झाले नाहीत.महावितरणला वीजनिर्मितीत येणारी अडचण व शेतकऱ्यांना नवीन जोडणी देण्यासाठी येणारा भरमसाठ खर्च लक्षात घेता शासनाने सौर कृषी पंप योजना आणली आहे. या योजनेत तीन एचपीसाठी साधारणपणे साडेसोळा हजार तर पाच एचपीसाठी २४ हजारांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागत आहे. त्यात महावितरणकडून तो सौरपंप तसेच सौर उर्जा निर्मितीसाठीचे साहित्यही संबंधित शेतकºयांना पुरविले जाणार आहे. शासनाने यासाठी विविध कंपन्या नेमल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यासाठी पाच वेगवेगळ्या कंपन्यांची नेमणूक केली आहे. शेतकरी संबंधित कंपनीकडे थेट मागणी नोंदवू शकते.हिंगोली जिल्ह्यातून या योजनेत आॅनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी होती. जवळपास १३ हजार शेतकºयांनी अर्ज सादर केले होते. पहिल्या वर्षी यासाठी दीड हजार पंप पुरविण्याचे उद्दिष्ट आल्याने संबंधित शेतकºयांना कोटेशनची रक्कम भरण्यास सांगितली होती. यापैकी ११२६ शेतकºयांनी रक्कम भरली आहे. तर जवळपास ८0६ शेतकºयांचा कंपनी व महावितरणच्या अधिकाºयांनी संयुक्त सर्व्हे केला आहे. यामध्ये सर्वाधिक ४१६ जणांनी रवींद्र एनर्जी, ३९८ जणांनी टाटा पॉवर, २१८ जणांनी सीआरआय प्रा.लि., ८७ जणांनी जैन इरिेगेशन सिस्टम लि. तर ७ जणांना मुंदडा सोलार एनर्जी लि. यांच्या पंपासाठी नोंदणी केलेली होती. यात टाटाने २८६, सीआरआयने १८७, रवींद्र एनर्जीने २५0 तर जैन इरिगेशनने ८३ जणांचा संयुक्त सर्व्हे केला आहे. जवळपास ७0 ते ७५ शेतकºयांचे बोअर हे ३00 फुटांपेक्षा जास्त खोलीचे असल्याने अशांना तीनऐवजी पाच एचपीचा पंप लागणार आहे. त्यामुळे हा बदल करण्यासाठी महावितरणने वरिष्ठ स्तरावर हे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एरवी पाच एचपीचा पंप हा दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असल्यास मिळतो. काही शेतकºयांचे प्रस्ताव मात्र संयुक्त सर्व्हेमध्ये फेटाळले गेले आहेत. शाश्वत स्त्रोताची अडचण असल्याचे दिसून आले आहे.सीमसाठी पाठपुरावा सुरूजिल्ह्यात लवकरच सौर कृषीपंप बसविण्याचे काम सुरू होणार आहे. जवळपास २४ पंप प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. ते म्हणाले, हे पंप तूर्त प्रायोगिक तत्त्वावर आल्यासारखे आहेत.जोपर्यंत या पंपांसाठीचे सीम महावितरणकडून मिळणार नाही. तोपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होत नाही. पाच पंपांसाठी असे सीम उपलब्ध झाले आहेत. उर्वरित पंपांचे सीम अजून आले नाहीत. त्याचबरोबर इतर पंपांचे कामही याच कारणामुळे सध्या थांबले आहे.सौरपंपांचे सीम उपलब्ध होताच ही कामे अधिक गतीने पूर्ण केली जाणार आहेत. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार असून शेतकरी यातील कोटेशनची रक्कमही भरत आहेत.
हिंगोलीत मिळाले २४ सौर कृषीपंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 1:08 AM