शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
4
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
5
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
6
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
7
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
9
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
10
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
11
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
12
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
13
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
14
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
15
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
16
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
17
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
18
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
19
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
20
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले

Hingoli: वाळू माफियांचा उच्छाद! भरधाव टिप्परने चिरडल्याने नवरदेवाचा जागीच मृत्यू

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: March 21, 2025 17:35 IST

Hingoli News: आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलला जाणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला होता.

- दिलीप कावरखेगोरेगाव  (जि. हिंगोली): वाळूने भरलेले भरधाव वेगातील टिप्पर नवरदेवाच्या अंगावर गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील चौकात घडली. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलला जाणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील गणेश उत्तम तनपुरे (वय २५) याचे २४ मार्च रोजी लग्न होणार होते. २१ मार्च रोजी घरी देवकार्य असल्याने आपल्या आजोबाला आणण्यासाठी तो दुचाकीवरून सकाळी पावणेसहा वाजेदरम्यान वाघजाळीकडे निघाला होता. दरम्यान, आजेगाव येथील चौकात पाठीमागून भरधाव वेगात असलेल्या वाळूच्या टिप्परने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्परचालक वाळू तिथेच टाकून घटनास्थळावरून पसार झाला. मृतदेह विच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. परंतु आरोपीस अटक केली जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयताच्या नातेवाइकांकडून घेण्यात आला होता.

तासभर रास्ता रोको; आरोपी अटक...वाळूच्या टिप्परसह आरोपीला तात्काळ अटक करून योग्य कारवाईच्या मागणीसाठी गोरेगाव पोलिस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावर टायर पेटवून देत माजी आ. संतोष टारपे, संदेश देशमुख, शेतकरी नेते गजानन पाटील, नामदेव पतंगे, बी. आर. नायक, नगरसेवक निखिल देशमुख, नातेवाइकांनी रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक विनोद झळके यांनी दोन तासांत आरोपीस अटक केली.

वाळू वाहतुकीचा उच्छाद...अपघाताच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील गोरेगाव येथे दाखल झाल्या. यावेळी सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक शिवसांभ घेवारे हे गोरेगाव येथे दाखल झाले. यावेळी संदेश देशमुख व गजानन कावरखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू