शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हिंगोलीत दरदिवशी ५१ मे. टन कचºयाचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:56 PM

शासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी नवनवीन उपक्रम हाती घेतले जात असले तरी, यामध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. एकट्या हिंगोली शहरात दरदिवशी जवळपास ५१ मेट्रिक टन घनकचरा जमा होतो. स्वच्छ व सुंदर शहरासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून आता प्रत्येक वार्डात समतादूत नेमले जाणार आहेत.

ठळक मुद्देहिंगोली : नागरिकांनी मोबाइलमध्ये ‘स्वच्छता’ अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी नवनवीन उपक्रम हाती घेतले जात असले तरी, यामध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. एकट्या हिंगोली शहरात दरदिवशी जवळपास ५१ मेट्रिक टन घनकचरा जमा होतो. स्वच्छ व सुंदर शहरासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून आता प्रत्येक वार्डात समतादूत नेमले जाणार आहेत. शिवाय ओला व सुका कचºयासाठी नवीन २० घंटागाडी शहरातून फिरणार आहेत.वाढत्या शहरीकरणामुळे घनकचºयाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील कचºयाच्या व्यवस्थापनासाठी पालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ व सुंदर शहरासाठी नियोजन केले आहे. हिंगोली शहरात दरदिवशी ५१ मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्यापैकी ३८ टक्के हा सुका कचरा असून आता कचºयांचे वर्गीकरण केले जाणार आहे. हिंगोली तालुक्यातील राहुली खु. येथे हिंगोली शहरातील कचरा जमा केला जातो. या ठिकाणी विड्रो कंपोस्टिंग केली जाणार आहे. प्लास्टिक कचºयापासून कोळसा तयार करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. तर ओल्या कचºयापासून गांडूळ खताची निर्मिती करण्याचा प्लॅन पालिकेचा आहे. शिवाय हा उपक्रम एका महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.स्वच्छ सर्वेक्षण २०१८स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात हिंगोली पालिकेने सहभाग घेतला आहे. जवळपास ४ हजार ४१ शहरांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. हिंगोली शहरात किती कचरा जमा होतो, कचºयाचे वर्गीकरण याची माहिती सर्वेक्षणादरम्यान केली जाणार आहे. नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाच्या अभियंता सनोबर यांनी केले. प्रत्यक्ष कृतीशिवाय शहर स्वच्छ बनणार नाही, किंवा पालिकेची कार्यक्षमता वाढवूनही या समस्येचे निराकरण करणे अशक्य आहे, त्यामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांत जनजागृती होणे गरजेचे आहे. स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.