हिंगोली : येथील नगरपालिकेच्या सभागृहात २६ फेबु्रवारी रोजी पार पडलेल्या सभेत विषय समिती सभापती व उपसभापतीची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. राजयकीय नाट्यमय वातावरणात सभा झाली.निवड प्रक्रियेची सभा नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी श्रीराम बांगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापतीपदी राष्ट्रवादीचे सय्यद अमेर अली, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य शे. आरेफ उस्मान, पाणीपुरवठा जलसमिती बागवान अ. माबूद मो. शिकूर, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, महिला व बालकल्याण सभापतीपदी ज्योती कुटे तर उपसभापतीपदी अर्चना भिसे यांची बिनविरोध निवड झाली. यात राष्टÑवादी काँग्रेस २, काँग्रेस २, शिवसेना १ व मनसे १ असा सामावेश आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष बाबाराव बांगर पदसिद्ध असून यात शेख निहाल, गणेश बांगर व जीतसिंह साहू यांचा सामावेश आहे. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी काम पाहिले, तर मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सहकार्य केले. सहा विषय समित्यांची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली. प्रत्येक समितीसाठी एक -एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणुक अधिकाºयांनी सभापतींची निवड घोषित केली. कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर फटाके फोडून निवडीचा आनंद साजरा केला.प्रतीक्षा संपली : तणावपूर्ण शांततेत निवडमागील अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर विषय समित्यांची निवड प्रक्रीया तणावपूर्ण शांततेत बिनविरोध पार पडली. गेल्या अनेक वर्षांनंतर येथील नगरपालिकेत नगरसेवकांनी विषय समित्यांच्या निवडीचा आग्रह धरला होता. अखेर सोमवारी सभापतींची निवड झाली.नगरपालिकेच्या विषय समित्यांवरील सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. परंतु त्याच दिवशी या समित्यांच्या सभापतींचीही निवड करण्याची मागणी होती. मात्र असे कायद्यात नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.२००१ नंतर हिंगोली पालिकेत विषय समित्याही गठीत करण्यात आल्या नाही, ना सभापतींची निवड झाली. अखेर २०१८ मध्ये ही प्रक्रिया पार पडल्याने १७ वर्षानंतर विषय समित्यांचे सभापती पालिकेत
हिंगोलीत सभापती उपसभापती निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:44 AM