शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हिंगोली तालुक्यातही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:29 AM

तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.हिंगोली तालुक्यात हिंगोलीसह समगा, हिंगणी, कोथळज, दुर्गधामणी, मालवाडी, चिखलवाडी आदी गावांच्या शेतशिवारात कयाधू नदीचे पाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले. हिंगोली शहरापर्यंत कयाधूचे पाणी पात्रातून वाहात होते. मात्र पुढे गेल्यानंतर अनेक मोठे ओढे या नदीत मिसळतात. त्यामुळे पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. तरीही या भागातील पाच ते सहा गावांतील शेतशिवारात कमी-अधिक प्रमाणात या पुराचे पाणी घुसले होते.हिंगोली तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी माजी सभापती दिलीप घुगे यांनी केले. तर औंढा तालुक्यातील पूर, कंजारा आदी परिसरातील गावांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नामदेव कल्याणकर यांनी केली.पिके उन्मळताहेतलोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तर आहेच. सोबत जोमात आलेली पिके सततच्या पावसाने उन्मळून जातात की काय? याची धाकधूकही आहे. जास्त पाऊस व्हावा व धरण भरावीत ही अपेक्षाही आहे. मात्र जादा पावसाने सुगी हातची जावू नये, अशीही प्रार्थना आहे.वसमत तालुक्यात गेल्या तीन वर्षांत कमी पाऊस व दुष्काळसदृष्य स्थिती अनुभवली आहे. यावर्षी सुगी चांगली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून वरूणराजा पुन्हा परतला. त्यामुळे पिकांवर पडलेला ताण हलका झाला. पिके पुन्हा तरारली. मात्र आता सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने नदी, नाले, तलाव भरून वाहत आहेत. त्याचा फटकाही शेती शेतकऱ्यांला बसत आहे.सतत तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने आसना, उघडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी शेजारील गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागण्याची भिती आहे.कौठा, कुरूंदा, किन्होळा आदी गावातील नदी किनाºयांवर असलेल्या शेतकºयांच्या शेती पुरामुळे खरडल्या जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकºयांत धाकधूकही आहे.येलदरी, सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी या पावसाने वाढत आहे. पाणी वाढत असल्याचा आनंद आहे. धरण भरले तर पुढच्या सुगीसोबत वर्षभराची चिंता संपणार आहे. त्यामुळे धरणाची पाण पातळी वाढत असल्याचा आनंदही आहे. त्यामुळे आनंद व धाकधूक वाढवणारा हा पाऊस ठरत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस