- इस्माईल जाहगीरदार.वसमत (जि. हिंगोली): आज सकाळी हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांना सकाळी ६ वाजून ८ मिनिट ते ६ वाजून २४ मिनिटाच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे.
हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला संपर्क केला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे. भुकंपाचे दोन धक्के बसत आज सकाळी जमीन हादरली. गत तीन वर्षांत अनेक वेळा भूकंपाचे धक्के या भागात जाणवले आहेत. पण हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
हादरे बसले त्यावेळी पक्षांनी किलबिलाट करणे सुरू केले. तर गोठ्यातील जनावरांनी हंबरडा फोडला. जमीन हादरताच नागरीक घराबाहेर पडणे सुरू केल.६:८ वाजेनंतर दुसरा सदरा ६:१९ वाजेदरम्यान बसला.
जिल्हा हादरला...हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, नर्सी, कवठा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचे दोन हदरे लागोपाठ जाणवले.वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे,वापटी, परीसर भुकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सहा वर्षांपासून धक्का...गत पाच ते सहा वर्षा पासुन भुकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ला भुगर्भातुन जोराचा आवाज येत जमीन हादरली. आता पर्यंतचा हा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यासह नांदेड व परभणी या जिल्ह्यातील अनेक गावांना पण गुरुवार झालेल्या भुकंपाचे हादरे जाणवले.
वसमत शहरास प्रथमच तिव्र धक्का....तालुक्यातील पांग्रा शिंदे व परीसरातील गावांना मोठा तिव्र धक्का जाणवला वसमत शहरातील नागरीक घरा बाहेर पडले होते,शहर वासीयांनी प्रथमच येवडा मोठा धक्का बसला आसल्याची प्रतिक्रिया दिली, यापुर्वी सौम्य धक्के जाणवत होते.परंतु गुरुवार रोजी सकाळी बसलेला भुकंपाचा धक्का भयभीत करणारा आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी..गुरुवारी सकाळी भूकंपाचे दोन हजारे बसले तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.