शहरं
Join us  
Trending Stories
1
Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी
2
Rain Update : कालपासून राज्यात जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील 'या' भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार
3
अदानींविरोधात आंतरराष्ट्रीय कट! हिंडेनबर्गनं दोन महिन्यांपूर्वीच क्लायंटशी शेअर केलेला रिपोर्ट, मोठा गौप्यस्फोट
4
अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी
5
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 
6
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; TATA Motors मध्ये तेजी, टायटन कंपनीचे शेअर्स घसरले
7
पुण्यात मध्यरात्री कारच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी!
8
Income Tax Rule: तुमच्या मुलानं कमाई केली तर, कोण भरणार इन्कम टॅक्स? काय म्हणतो आयकर विभागाचा नियम, जाणून घ्या
9
खळबळजनक! शाळेतलं प्रेम, लव्ह मॅरेज... कपलने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?
10
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेला फटका; रुळांवर साचलं पाणी, रेल्वेसेवा ठप्प
11
मोठी बातमी: मुंबईला पावसाने झोडपलं; शाळा-कॉलेजबाबत BMCचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
अपघातानंतर वडिलांना फोन, अन् नॉट रिचेबल; वरळी प्रकरणातील आरोपीची धक्कादायक माहिती समोर
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश तसेच कीर्ती मिळेल, कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल!
14
अरुण गवळीविरोधातील मकोकाचे पेपर्स गहाळ; गुन्हे शाखेची विशेष न्यायालयाला माहिती
15
आव्हानांवर मात करीत महाराष्ट्र ‘नंबर वन’; परकीय गुंतवणूक वाढल्याची उदय सामंतांची माहिती
16
पुण्याचे आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते
17
"फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला, पण आता..."; शरद पवारांचे मोठं विधान
18
कोकणात धुवाँधार पावसाची शक्यता; सिंधुदुर्गात रेड तर रायगड, रत्नागिरीत यलो अलर्ट
19
अग्रलेख : महायुतीचे एकत्रीकरण! विधानसभेसाठी प्रत्यक्षात टीकेपर्यंत शंकाच
20
पासपोर्ट सेवा केंद्रांना भ्रष्टाचाराची वाळवी; १४ अधिकाऱ्यांवर गुन्हे तर अनेकजण सीबीआयच्या रडारवर

हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प

By विजय पाटील | Published: June 28, 2024 1:54 PM

मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर कनेरगावनजीक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाची अद्याप कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची प्रकृती खालावत आहे. या आंदोलनाबाबत गजानन कावरखे, नामदेव पतंगे, संदीप मानमोठे, शांताराम सावके, के.के. सावके या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून उपोषण सुरू केले होते. मात्र कुणीच दखल घेत नसल्याने काल शांताराम सावके या शेतकऱ्याने स्वत:ची दुचाकी पेटवून देत निषेध नोंदविला. यामुळे या आंदोलनाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या आंदोलकांच्या समर्थनार्थ आज हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर कनेरगावपासून एक किमी अंतरावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी टायर जाळून वाहतूक थांबविली होती. चोख पोलिस बंदोबस्तही होता. या आंदोलकांनी सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. तर लोकप्रतिनिधीही टक्केवारीची कामे करण्यात मश्गुल असून त्यांना शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यास वेळ नसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अन् शेताला कुंपन करून दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशाराही दिला.

वाहनांच्या रांगास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर टायर जाळलेले असल्याने वाहनांना तेथून रस्ता काढणेही शक्य नाही. शिवाय अनेकांनी तर या वाहनांतून उतरून आंदोलनात सहभाग घेतल्याचेही पहायला मिळाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र