लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली जि.प.च्या कृषी विभागाकडून शेतकºयांचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी समितीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली.यापूर्वी राजीव सातव हे कृषी सभापती असताना अशा प्रकारे शेतकºयांना पुरस्कार रुपाने सन्मानित करण्यात आले होते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रत्येक सर्कलमधील एका शेतकºयाला सन्मानित करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने घेतला आहे.जिल्ह्यात डाळिंबाची लागवड वाढत चालली आहे. विविध भागात डाळिंबाच्या फळबागा दिसत आहेत. मात्र या फळबागांना विम्याचे कवच शासनाने दिले नाही. त्यामुळे या फळबागा नैसर्गिक वा इतर आपत्तीत सापडल्या तर शेतकºयांना भरपाई मिळण्याची कोणतीच संधी नाही. यात शेतकºयांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात डाळिंब फळबागांना पीकविमा योजनेत सहभागी करण्याची मागणी करणारा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचे ठरले. या बैठकीस राखोंडे यांच्यासह जि.प.सदस्य शिवहार नरवाडे, डॉ.सतीश पाचपुते, पुष्पा थोरात, रत्नमाला चव्हाण, श्रीशैल्य स्वामी, कैलास सोळुंके, फकिरा मुंढे, विलास काठमोडे, भीमराव भगत, योगिता दशरथे यांची उपस्थिती होती.इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष घटक योजनेतील विहिरींच्या अनुदान वाटपाबाबतही यावेळी संबंधित अधिकाºयांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद करणार शेतक-यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:36 AM