हिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.२४ टक्के लागला असून औरंगाबाद विभागीय मंडळात जिल्हा जालना व बीडपाठोपाठ तिसऱ्या स्थानी आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे.
हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ४४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८0 जणांनी परीक्षा दिली. यातील १७१ विशेष प्राविण्यात, १८२९ प्रथम श्रेणीत, २१३0 द्वितीय श्रेणीत तर अवघे ४८ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ९५.३९ टक्के लागला आहे. कला शाखेचे ६७५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. यापैकी ६६७0 जणांनी परीक्षा दिली. यातील ३८१ विशेष प्राविण्यात, २७१५ प्रथम श्रेणीत, २३६८ द्वितीय श्रेणीत तर ९१ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ८३.२८ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेसाठी ९0४ जणांनी अर्ज भरले होते. यापैकी ९0२ जणांनी परीक्षा दिली. २२0 जण विशेष प्राविण्यात, ४३३ प्रथम श्रेणीत, २0६ द्वितीय श्रेणीत, ८ काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा सर्वाधिक ९६.१२ टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला ३२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी ३२८ जणांनी परेक्षा दिली. १५ विशेष प्राविण्यात, १५३ प्रथम तर १0५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ८३.२३ टक्के लागला.
पुरवणी परीक्षेचा निकाल ३९.५८ टक्केहिंगोली जिल्ह्यात पुरवणी परीक्षेस विज्ञान शाखेचे २४१ पैकी २३८ जण परीक्षेस बसले. २ प्राविण्यात, ४८ प्रथम श्रेणीत, ३२ द्वितीय तर ६८ काठावर उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या सर्व ५६३ जणांनी परीक्षा दिली. यापैकी ३ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय तर १५८ काठावर उत्तीर्ण झाले. वाणिज्यच्या १२ ही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ५ काठावर उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य अभ्यासक्रमांच्या ३६ पैकी ११ जणांना काठावर यश मिळाले.
मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का जास्तमुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का यंदाही मुलांपेक्षा जास्तच आहे. यंदा जिल्ह्यात सर्व शाखांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार ४0५ आहे. यापैकी १२२८0 जणांनी परीक्षा दिली असून १0८७३ जण उत्तीर्ण झाले. यापैकी ५८९३ मुले तर ४९८0 मुली आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.९७ तर मुलींचे ९३.१७ आहे.
तालुक्यांमधून सेनगाव अव्वलतालुकानिहाय निकालाचा विचार केला तर सेनगाव तालुका अव्वल राहिला आहे. हिंगोली तालुक्यात नोंदणी केलेल्या २८५0 पैकी २८१२ जणांनी परीक्षा दिली. यातील २३९१ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ८५.0३ टक्के आहे. कळमनुरी तालुक्यात नोंदणी केलेल्या २५७२ पैकी २५५८ जणांनी परीक्षा दिली. यातील २२८९ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.४८ टक्के आहे. वसमत तालुक्यात नोंदणी केलेल्या ३९२५ पैकी ३८८७ जणांनी परीक्षा दिली. यापैकी ३४७६ जण उत्तीर्ण झाले.हे प्रमाण ८९.४३ टक्के आहे. सेनगाव तालुक्यात नोंदणी केलेल्या १६८३ पैकी १६६१ जणांनी परीक्षा दिली. तर १४९५ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९0.0१ टक्के असून जिल्ह्यात सर्वाधिक आहे. औंढा तालुक्यात नोंदणीच्या १३७५ पैकी १३६२ जणांनी परीक्षा दिली. यापैकी १२२२ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.७२ टक्के आहे.