शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मी फेसबूक लाईव्ह नव्हे, तर फेस टू फेस भेटणारा मुख्यमंत्री - शिंदे

By विजय पाटील | Published: March 10, 2024 7:01 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हिंगोली: घरातून काम करणारा, उंटावरून शेळ्या हाकणारा मी नाही. आपत्तीत थेट जनतेच्या दारी पोहोचणारा आहे. फेसबूक लाईव्ह करणारा नव्हे, तर जनतेची फेस टू फेस भेट घेणारा मुख्यमंत्री असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हिंगोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ते आले होते. मंचावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा.हेमंत पाटील, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, आ.राजू नवघरे, आ. बालाजी कल्याणकर, माजी खा. शिवाजी माने, माजी आ.रामराव वडकुते, माजी आ.गजानन घुगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. त्याची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. राज्यात २२ कार्यक्रमांतून ५ कोटी ६५ लोकांना थेट लाभ दिला. त्यामुळे गेलो तेथे लोक प्रेम देतात. कामांचा एवढा धडाका आहे की, त्यासमोर महावलिकास आघाडीच्या लवंगी फटाक्याच्या आवाजच येत नाही.पूर्वी लोकांची कामे होत नसत त्यामुळे ते लाभाचा नादच सोडून द्यायचे. हे चित्र आता बदलले.मी स्वत:ला सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे, तर कॉमन मॅन समजतो. उद्या कोणीही सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला तर आनंद होईल. ही काही कुणाची जहागिरी नाही. आम्ही सरकारमधून बाहेर पडलो कारण तेव्हा कामे होत नसल्याने आमदार, खासदारांत नैराश्य होते. मी मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यकर्त्यांसाठी नव्हे, तर सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. दुष्काळी मदतीचे निकष बदलले. दोनहून तीन हेक्टरला मदत देतो. त्यातही वाढ केली. महिलांना ५० टक्के तिकिटसवलत दिली. यामुळे एसटी फायद्यात आली, इतका लाभ महिलांनी घेतला. विरोधक म्हणतात की, उद्योग पळाले. गेल्यावर्षी १ लाख ६७ हजार कोटी तर यंदा ३ लाख ७३ हजार कोटींची उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक केली. राज्य पहिल्या नंबरवर आलयं.

मुख्यमंत्री शिंदे हिंगोली जिल्ह्याबाबत म्हणाले की, येथील सिंचनाचा अनुशेष दूर करू. हळद संशोधन केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय दिले आहे. कयाधूत टनेलने येलदरी व सिद्धेश्वरचे पाणी सोडण्याचा निर्णयही घेवू. इतर अनेक बाबींबात त्यांनी सकारात्मकता दाखविली.

टिकणारे मराठा आरक्षण दिलेमी छत्रपती शिवरायांची शपथ घेत आरक्षणाचा शब्द दिला होता. तो पाळला. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देण्यात येईल, असे म्हटले होते. ते तसेच दिले. हे आरक्षण न्यायालयात का टिकणार नाही, हे विरोधकांनी सांगावे, ते कसे टिकेल हे मी सांगतो, असे आव्हानही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तर जुन्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. नव्या आरक्षणानुसार भरतीही सुरू झाली. त्यातील उमेदवारांना भविष्यातही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.उबाठाचे लोक यावरुन राजकारण करीत आहेत. तसे चालत नाही, लोक समजदार असल्याचेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे