शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पाहिले आपुले मरण म्यां आपुल्याचि डोळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:52 AM

'बूट पॉलिशचा व्यवसाय करताना रेल्वे पकडण्यासाठी पळत असताना रेल्वे सुटली आणि पायही निसटले. हा कुठला स्टंट नव्हता तर जीव वाचवण्याची धडपड होती. दैव बलवत्तर म्हणून वाचलो, नवा जन्म पाहिला,' अशी प्रतिक्रिया धावत्या रेल्वेत स्टंट करणारा म्हणून प्रसिद्ध झालेल्या व्हायरल व्हीडिओतील युवक प्रकाश भीमराव खरात याने दिली. तो मृत्यूच्या दारात असताना मात्र कोणी रेल्वेची साखळी ओढून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट या थरारक घटनेचे चित्रीकरण करण्यात मग्न होते.

रमेश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : 'बूट पॉलिशचा व्यवसाय करताना रेल्वे पकडण्यासाठी पळत असताना रेल्वे सुटली आणि पायही निसटले. हा कुठला स्टंट नव्हता तर जीव वाचवण्याची धडपड होती. दैव बलवत्तर म्हणून वाचलो, नवा जन्म पाहिला,' अशी प्रतिक्रिया धावत्या रेल्वेत स्टंट करणारा म्हणून प्रसिद्ध झालेल्या व्हायरल व्हीडिओतील युवक प्रकाश भीमराव खरात याने दिली. तो मृत्यूच्या दारात असताना मात्र कोणी रेल्वेची साखळी ओढून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट या थरारक घटनेचे चित्रीकरण करण्यात मग्न होते.आखाडा बाळापूर येथील रहिवासी प्रकाश भीमराव खरात (२६) हा बूट पॉलिशचा व्यवसाय करतो. सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन बूट पॉलिशचे काम करून आपली उपजीविका भागवतो. अनेक रेल्वेमध्ये ही बूट पॉलिश करत करत तो भटकंती करत असतो आणि आपला प्रपंच सांभाळत असतो. एका लग्नाच्या निमित्ताने तो लातूर जिल्ह्याकडे गेला होता. लग्न समारंभ आटोपून तो नांदेड बंगळुरू रेल्वे पकडायला गेला. १२ जुलै रोजी ही घटना घडली. पॉलिशचे डबे आवरता आवरता रेल्वेची शिट्टी झाली आणि रेल्वे सुटली. तेथे थांबायची व्यवस्था नसल्याने हीच रेल्वे पकडायची म्हणून तो धावतच रेल्वेडब्यांकडे गेला. पण तोपर्यंत थोडीशी गती वाढली होती. नेहमीची पळापळीची सवय असल्याने रेल्वे आपल्याला सापडू शकते, या आत्मविश्वासाने त्याने रेल्वेच्या दरवाजाला हात घातला. परंतु लोखंडी पाइप हाती लागण्याऐवजी त्याचा हात खिडकीला लागला. दोन्ही हाताने खिडकीचे दार घट्ट पकडले. परंतु तेवढ्यातच प्लॅटफॉर्म संपला होता. त्याचे पाय खाली लोंबकळत होते आणि तो दरवाजाकडे जाण्यासाठी धडपडत होता.यादरम्यान गाडीचा वेग वाढला आणि प्रकाशचे पायही कुठेही टेकत नव्हते. आता आपले जीवन संपले असे त्याला वाटले. रेल्वेचा वेग वाढला तसे हातही साथ देत नव्हते. अखेर प्रकाशचे हात निसटले आणि पाठीवर पॉलिशचे साहित्य असलेल्या बॅगवरच पडला.मदत सोडून प्रवाशांचे मोबाईल चित्रीकरण !घटनेचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आणि धावत्या रेल्वेत स्टंट करणारा अशा पद्धतीने त्याचा सर्वत्र प्रचार झाला. आखाडा बाळापूरचा रहिवासी असल्यामुळे युवकाची लोकमत ने थेट भेट घेतली. सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रकाशने सांगितले की, हा स्टंट वगैरे नव्हता. मी गाडी पकडताना घडलेला अपघात होता. गाडी पकडता आली नाही. हात सुटले. त्यामुळे रेल्वेतून खाली पडलो. नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला. डोक्याला मार लागला असे त्याने सांगितले. सुदैवाने या घटनेतून प्रकाशचे प्राण वाचले. रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर तो बाळापूरला परतला. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रकाशला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात