लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी पुन्हा रुजू झाले तर सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सामूहिक रजेवर जाऊ असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला ग्रामसेवक-बीडिओ यांचा वाद चव्हाट्यावर आला असून हा वाद विकासासाठी मात्र अडथळा ठरत आहे.कळमनुरी पं.स. मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अधिकारी-कर्मचारी असा वाद रंगला आहे. बीडीओ मनोहर खिल्लारी व ग्रामसेवक युनियन यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला आहे. तीन महिन्यांच्या असहकार आंदोलनानंतर बीडीओ रजेवर गेल्याने प्रकरण शमले होते. त्यानंतर ते पुन्हा रुजू झाले. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात ग्रामसेवक युनियन व बीडिओ यांच्यातील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर सर्व प्रकरणे शांततेने सुरू असताना हा वाद पुन्हा पेटला आहे. मध्यंतरी बीडीओ रजेवर गेले होते. त्या ठिकाणी एस.एम.साहू यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा पदभार सोपवला. त्यानंतर ग्रामसेवक असहकार आंदोलन सोडून कामाला लागले होते. पंचायत समिती सदस्यांनी ठराव घेऊन ग्रामसेवक युनियनला पाठिंबा देत बीडिओंची बदली करण्याचा ठराव पाठविला. परंतु बीडीओंची काही बदली झाली नसल्याने ग्रामसेवक युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १० डिसेंबर रोजी निवेदन सादर केले आहे. गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी पंचायत समिती कार्यालय, कळमनुरी येथे जर पुन्हा रुजू झाले तर त्या दिवसापासून कळमनुरी पंचायत समितीअंतर्गत कार्यरत सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर ग्रामसेवक युनियन कळमनुरी तालुका अध्यक्ष शेख शैनोद्दीन, उपाध्यक्ष गोविंद दुधाटे, सचिव इरेश मठपती, सहसचिव मारुती काशीदे, कोषाध्यक्ष शिवाजी गवळी यांच्या स्वाक्षºया आहेत. निवेदनाची प्रत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली, सभापती पंचायत समिती कळमनुरी, उपसभापती पंचायत समिती कळमनुरी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांना पाठविण्यात आल्या आहेत. कळमनुरी पंचायत समितीमध्ये अधिकारी व ग्रामसेवक युनियनचा हा वाद ग्रामविकासाच्या मात्र मुळावर आला आहे.कळमनुरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केला असून दुष्काळात माणूस आणि शेतकरी जगविण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना करण्याची गरज असताना अधिकारी कर्मचारी मात्र जनतेचे दु:ख हलके करण्याऐवजी स्वत:चे वाद मोठे करून आपापसात लढण्यात मशगुल झालेले आहेत.विस्तार अधिकाºयाचे आकांड-तांडवलोकमतमध्ये ग्रामपंचायतींच्या प्रलंबित लेखाआक्षेपांसह विस्तार अधिकाºयांच्या दप्तरतपासणीबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर एका विस्तार अधिकाºयाचे पित्त खवळले होते. संबंधिताने पंचायत विभागातील एका कर्मचाºयाला केलेली दमदाटी चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे या विस्तार अधिकाºयाने अधिकारी-कर्मचाºयांचा व्हॉटस्अॅप ग्रुपही डीलीट केला. त्यामुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. हे वृत्त प्रकाशित झाले म्हणून कुणावर काही कारवाई झाली नसताना हा प्रकार घडल्याने त्याची एकच चर्चा ऐकायला मिळत होती. हा प्रकार पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी गांभिर्याने घेत गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाºयांची बैठक लावली होती. त्याला अनेकांनी दांडी मारली. मात्र अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली.
बीडीओ रुजू झाल्यास काम बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:31 AM