शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास मुख्याध्यापक राहतील जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 7:46 PM

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्याध्यापकांना सूचना

ठळक मुद्देजि. प. समाज कल्याण विभागाकडून मुख्याध्यापकांना इशारा 

हिंगोली : २०१९-२० यावर्षातील इतर मागास प्रवर्गातील ओबीसी विद्यार्थ्यांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना समाजकल्याण अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. शिष्यवृत्ती लाभापासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकास जबाबदार धरले जाणार आहे.

एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, या दृष्टिकोनातून संबंधित जि. प. शाळेच्या शिक्षकांना समाजकल्याण विभातर्फे सूचना दिल्या आहेत. शासनाने २०१९-२० या चालू वर्षापासून ५ वी ते १० वीत शिकणाऱ्या अनु. जाती, विजाभज प्रवर्गातील मुलींप्रमाणेच इतर मागासवर्गातील ओबीसी मुलींना देखील सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. ज्यात ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थिनींना ६०० रुपये व ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती तसेच १ ली ते १० वीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील ओबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूव शिष्यवृत्ती योजना यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्नाची मर्यादा २.५० लक्ष वार्षिकइतकी राहील.

सदर योजनेत प्रत्येक विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचे दर हे अनिवासी विद्यार्थ्यांना १५०० रुपये व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ५५०० प्रमाणे राहतील. तसेच १ ली ते १० वीत शिकणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती डीएनटी विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली. यामध्ये विद्यार्थ्याच्या पालकाची उत्पन्नाची मर्यादा २ लक्ष वार्षिक  असेल. यात १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना १ हजार व इयत्ता ९ वी व १० तील विद्यार्थ्यांना १५०० रुपये प्रमाणे शिष्यवृत्तीचे दर राहतील. अशा प्रकारच्या शिष्यवृत्तीबाबतच्या योजना समाज कल्याण विभागामार्फत नव्याने लागू करण्यात आलेल्या आहेत. वरील सर्व योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक  खाते उघडून त्वरित अर्ज, प्रस्ताव सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आॅफलाईन पद्धतीने गटशिक्षणाधिकारी मार्फत सॉफ्टकॉपीसह पेनड्राईव्हमध्ये समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयात तत्काळ सादर करावे लागणार आहे. शिष्यवृत्तीसंदर्भात तालुकास्तरीय बैठक घेऊन मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती जि. प. समाजकल्याण शिष्यवृत्ती विभागातर्फे देण्यात आली.

योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहू नयेतसेच चालू २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील जि.प. समाज कल्याण विभागातर्फ देण्यात येणाऱ्या इतर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मॅट्रिकपूर्व शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क ,प्रतिपूर्ती योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, इत्यादी योजनेंतर्गत एखाद्या शाळेकडून प्रस्ताव येणे बाकी असेल तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ शिष्यवृत्तीचे प्रस्ताव जि.प. समाज कल्याण विभागात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.४ शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकावर राहणार आहे. त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अचूक प्रस्ताव वेळेत सादर करावेत याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. शासनाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यास मिळालाच पाहिजे या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीSchoolशाळाHingoliहिंगोली