लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव: अवैध धंद्याला रान मोकळे असलेल्या सेनगाव तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह, स्थानिक पोलिसांच्या वतीने कारवाईची धडक मोहीम सुरू केली. यामुळे सर्वच अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी आपला गाशा गुंडाळून ठेवला आहे.शहरासह तालुक्यात अवैधरित्या दारु, गुटखा विक्रीसह मटका ,जुगार धंदे अवैध रॉकेल विक्री राजरोसपणे होत होती. या अवैध धंद्यांविरोधात पोलीस यंत्रणेकडून केवळ उद्दिष्टापुरती कारवाई केली जात असे. त्यामुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले होते. पंरतु मागील आठवड्यात याविरोधात गुन्हे शाखेच्या पथकासह सेनगाव पोलीसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. तालुक्यात सेनगाव येथे राशनचे धान्य, गुटखा, पानकनेरगाव येथे जुगार तर वलाना येथे अवैध राकेलसाठ्यासह अन्य ठिकाणी कारवाई झाल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस प्रशासनाची कारवाई मोहीम तालुक्यात कायम चालू आहे. पंरतु अवैध व्यावसायिकांनी धंदे कारवाईच्या भीतीने बंद केले आहेत. मोहिमेदरम्यान पोलिसांच्या हाती काही लागत नसल्याचे चित्र आहे.
अवैध व्यावसायिकांनी गाशा गुंडाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:37 PM