शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

वारंगा फाटा येथे अवैध रॉकेलसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:32 AM

येथील एका बांधकाम शेडमध्ये अवैधरित्या ठेवलेला रॉकेलसाठा १९ आॅक्टोबर रोजी जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर व पथकाने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगा फाटा : येथील एका बांधकाम शेडमध्ये अवैधरित्या ठेवलेला रॉकेलसाठा १९ आॅक्टोबर रोजी जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर व पथकाने केली.वारंगाफाटा येथे धाड टाकून १३ हजार लिटर रॉकेलसाठा जप्त करण्यात आला. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर आणि पोलीस प्रशासनाने शुक्रवारी ही कारवाई केली. कारवाई दरम्यान अवैधरित्या साठवणुक केलेल्या ३७ बॅरेल प्रत्येकी २०० लिटर व एका टँकमध्ये ५ हजार ६०० लिटर रॉकेल मिळून आले. याप्रकरणी नायब तहसिलदार श्रीराम पाचपुते यांच्या फिर्यादीवरून एजन्सीचा मालक विजयकुमार संजयकुमार अग्रवाल विरूद्ध आखाडा बाळापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि व्ही. एम. केंद्रे करीत आहेत.कारवाई दरम्यान १३ हजार रॉकेलसाठा, तसेच टँकर व रिकाम्या बॅरेल जप्त करण्यात आले आहे. एकूण ३६ लाखांच्या जवळपास मुद्देमाल असल्याची माहिती सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर, सपोनि ओमकांत चिंचोलकर, ३ मंडळ अधिकारी ५ तलाठी आदींनी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानाला सील करण्यात आले. शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत कारवाई सुरूच होती. पथकाने केलेल्या धडक कारवाईमुळे मात्र अवैधरित्या रॉकेल साठवणुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस