हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील वाकोडी गावापासून जवळ असलेल्या शिवानी ( बु.) येथील नालीचे पाणी शाळेत येऊ लागल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेत शाळा ग्रामपंचायतमध्ये भरविली. जोपर्यंत नाली बांधून देण्यात येत नाही. तोपर्यंत ग्रामपंचायतमध्ये शाळा भरली जाईल, असेही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले.
मागच्या काही महिन्यांपासून गावातील नालीचे पाणी पहिली ते पाचवी पर्यंत असलेल्या शाळेत येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना तसेच शिक्षकांना या नालीच्या पाण्याचा त्रास होत आहे आणि त्यांना या नालीचा पाणी मुळे आजारही उत्पन्न झाले आहेत. शिक्षण विभाग व ग्रामपंचायतला याबाबत अनेकदा सांगण्यात आले. परंतु याप्रकरणी ना शिक्षण विभागाने दखल घेतली, ना ग्रामपंचायतीने. आज नाली बांधू, उद्यान नाली बांधू, असे म्हणून दिवस दोन्ही विभाग चालढकल करत आहे.त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा चक्क ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये भरविली.२७ सप्टेंबर रोजी प्रा.शा. शिवणी येथील व्यवस्थापन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी शाळेसमोरून गावातील सांडपाण्याची नाली वाहत आहे. येथे खेळताना विद्यार्थांना शाळेत येताना-जाताना त्रास होत आहे. त्यामुळे पाय घसरून विद्यार्थी पडत आहेत.दुसरीकडे दुर्गंधी सुटत आहे.
पाच महिन्यांपूर्वी कळविले...शाळा व्यवस्थापन समितीने पाच महीन्यापासून ग्रामसेवक व सरपंचांना लेखी व तोंडी सूचना दिली. परंतु सांडपाण्याची विल्हेवाट लावली नाही. म्हणून २७ रोजी शाळा व्यवस्थापन समिती शिवणी (बु) यांच्या आदेशानुसार ग्रा. पं. कार्यालय शिवणी बु. येथे सर्व पहिली ते पाचविचे वर्ग भरविण्यात आले. आहे.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कूरूडे, उपाध्यक्ष, गोकर्ना हरण, बंडू सावंत,शिला भालेराव, वंदना भालेराव, शेख, हसीना शेख निजाम व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.