लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा कचेरीवर ५ जुलै रोजी नाथजोगी समाजाचा मोर्चा धडकला. दिवसेंदिवस भटक्या जमातीतील व्यक्तीवर वाढणारे अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधवांचा मोर्चा निघाला.हिंगोली जिल्ह्यातील भटक्या जमातीतील नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजबांधवांनी सकाळी १0.३0 च्या सुमारास गांधी चौक येथून हा मोर्चा काढला. इंदिरा गांधी चौक, अग्रसेन चौक मार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात महिला, पुरूष व तरूणांची मोठी गर्दी होती. हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प होती. मुले पळवून नेणाºय टोळीतील समजून भटक्या जमातीतील पाच जणांची हत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडली होती. मयत हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवीचे आहेत. अशा घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे या समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिक्षा मागून पोट भरणे हे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. परंतु आता भटकंती करत असताना चोर, मुले पकडणाऱ्या टोळीतील समजून मारहाण केली जात असून हत्येच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने भटक्या समाजबांधवांना न्याय द्यावा. तसेच भिक्षा मागण्यासाठी गावो-गाव फिरणाºयांना पोलीस प्रशासनाने ओळखपत्र द्यावीत. धुळे जिल्ह्यातील हत्येच्या घटनेतील मारेकºयांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच मृत्यू झालेल्या कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी समाज बांधवांनी ५ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढला.या मोर्चात सहभागी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, युवा सेनेचे दिलीप घुगे, राम कदम यांच्यासह भटक्या विमुक्त विकास परिषद संचलित नाथजोगी विकास सेवा संस्था अध्यक्ष नारायण बाबर, सिद्धूनाथ शिंदे, आप्पा काशीराम शिंदे आदींच्या निवेदनावर स्वाक्षºया आहेत.नाथजोगी समाजाच्या मोर्चात अबालवृद्ध सहभागी झाले होते. जिल्ह्यात आधीच कमी लोकसंख्या असलेल्या या समाजातील जिल्ह्याच्या विविध भागात राहणाºयांनी हजेरी लावली होती. महिला, वृद्ध, लहान मुलेही या मोर्चात दिसून येत होते. आम्हाला न्याय द्या सरकार न्याय द्या, संरक्षण मिळालेचपाहिजे, राईनपाड्यातील मृतांच्या नातेवाईकांना भरघोस मदत द्या, भटक्यांना ओळखपत्र द्या आदी मागण्यांचे फलक घेवून रस्त्यावर उतरले होते. अगदी शिस्तीच्या मोर्चात नाथजोगी समाजाच्या पारंपरिक वाहनांवरील पालख्याही सहभागी केल्याचे चित्र होते.मोर्चासाठी आलेल्या प्रत्येकाने पदरी भाजी-भाकरी बांधून आणली होती. मोर्चा आटोपल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास ही सर्व मंडळी जि.प. शाळेसमोर पाण्याच्या टाकीखाली सामूहिक भोजनास बसली होती.
सुरक्षिततेसाठी नाथजोगी समाज रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:54 AM