यावेळी माजी आ. संतोष टारफे, बाबा नाईक, केशव नाईक, डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, डॉ. नामदेव कोरडे, डॉ. वैजनाथ सूर्यवंशी, डॉ. राम मुंडे, डॉ. देवीदास सुपरकर आदी उपस्थित होते.
भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राात डॉ. सचिन भायेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते बालकांना जंतनाशकाची गोळी खाऊ घालण्यात आली. यावेळी डॉ. गुठ्ठे, विस्तार अधिकारी कमलेश ईशी, आरोग्य सहायक डी. आर. पारडकर, सी. टी. गायकवाड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश घुले, बनसोडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्यालयातील केंद्रास भेट देण्यात आली. येथे १ हजार ६३३ पैकी १ हजार २४ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गोळी खाऊ घालण्यात आली. बालकांना गोळी दिल्यानंतर दोन तास थांबविण्यात येत होते. सावा येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे ५० लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.