यावेळी मंत्री टोपे म्हणाले, हिंगोलीसारख्या ठिकाणी डोळ्यांच्या आजाराचे निदान व अत्याधुनिक फेको मशीनद्वारे नेत्रचिकित्सा, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज बाह्यरुग्ण विभाग व ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक लेन्स क्लिनिक, प्टेरिजीएम आदींसह शस्त्रक्रिया करण्यासाठी उभारलेले हे नेत्रालय अतिशय अद्ययावत आहे. त्याचबरोबर बालरुग्णांचीही सेवा येथे घडणार आहे. डॉ. कदम यांनी आईच्या नावाने उभारलेल्या या रुग्णालयात रुग्णांनाही तेवढीच आईची ममता, जिव्हाळा मिळेल, यात शंका नाही. सेवाभावी वृत्ती ठेवून काम करणाऱ्या या दाम्पत्याने साकारलेल्या वास्तूत रुग्णांसाठी इतरही चांगल्या सुविधा ठेवल्या ही जमेची बाजू आहे. आपल्या हातून भविष्यातही चांगली रुग्णसेवा घडावी, अशी सदिच्छाही टोपेे यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. गोपाल कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. जिल्हाभरातून आलेल्या अनेक हितचिंतक, आप्तेष्ट आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
गोदावरी नेत्रालयाचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:30 AM