हिंगोली : येथील शासकीय तंत्र निकेतनच्या मैदानावर दोन दिवशीय इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस असोसिएशन अंतर्गत डब्ल्यू-२ झोन विभागीय मुलींच्या स्पर्धेचे उदघाटन १८ नोव्हेंबर रोजी झाले. अध्यक्षस्थानी शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ठेंबरे, उप प्राचार्य एफ.बी. तानूरकर, जिमखाना उपाध्यक्ष अभय आढावे, स्पर्धेचे निरीक्षक शामराज, आर. एस. जोशी यांच्यासह लातूर, उस्मानाबाद येथील प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी खेळाडूंनी पथ संचालन केले. विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती अंगीकारावी याबाबत त्यांना शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी.बी.कपूर यांनी केले.
अभ्यासासोबतच क्रीडा गुणांना वावयावेळी प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा अनुषंगाने अभ्यासक्रमाबरोबर विविध क्रीडा गुणांना वाव देण्याबाबत तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले. खेळामुळे विद्यार्थ्यांची सहनशीलता वाढते असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे यांनी व्यक्त केले. शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथे दररोज दोन तासिका खेळासाठी उपलब्ध दिल्याबद्दल तंत्रनिकेतनचे जयकुमार ठोंबरे यांनी कौतूक करीत आवश्यक ती मदत देण्यास तयार असल्याचे सांगितले.
४०० खेळाडूंचा सहभागस्पर्धेत डब्ल्यू-२ मराठवाडा झोन मधील हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातील तंत्रशिक्षण पदविका घेणाऱ्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, बास्केटबॉल, चेस, कॅरम, ॲथलेटिक्स आदी १४ प्रकारच्या खेळांचा समावेश आहे. यशस्वीतेसाठी तंत्रनिकेतनचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत असल्याची माहिती प्रा. डॉ. जावेद शेख यांनी दिली