हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील शासकीय नर्सिंग स्कूल येथे मंगळवारी निमोकोकल व्हॅक्सिनेशन मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. मोहिमेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार होते. शून्य ते एक वर्षाच्या आतील बालकांसाठी न्यूमोकोकल न्यूमोनिया आणि मेनीजायटीसपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण कार्यक्रमांतर्गत न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट व्हॅक्सिन मोहीम सुरू केली आहे.
कार्यक्रमास डॉ. मंगेश टेहरे, डॉ. सचिन भायेकर, डॉ. शेळके, कविता भालेराव, डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, अधिसेविका बोरा, परिसेविका अलग, वर्षा खंदारे, तुपकरी, मुनेश्वर, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रमाधिकारी उद्धव कदम यांनी केले.
तीन लाभार्थ्यांना दिली लस...
मंगळवारी उद्घाटनाच्या दिवशी तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात न्यूमोकोकल व्हॅक्सिनची लस देण्यात आली. लसीकरण मोहीम राबविणाऱ्या प्रियंका राठोड, पूनम पंडित, कलावती राठोड, शीतल सुनके यांनी लस दिली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात बालकांना लस देऊन मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. शासनाची सूचना येईल त्याप्रमाणे बालकांना लस देण्यात येईल.
-डॉ. सचिन भायेकर, लसीकरण अधिकारी.