लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अतिक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. नगरपालिकेने जाहीर प्रगटनाद्वारे इशारा दिल्यानंतर तर अतिक्रमणाचा वेग वाढल्याचेच चित्र आहे. इशारा देवून न.प. गप्प राहणार हे माहित झाल्यानेच अतिक्रमणधारकांचा जोश वाढला की काय, अशी शंका उत्पन्न होत आहे. जि.प.च्या मैदानावरही अतिक्रमणाच्या काठ्या उगवल्या आहेत. या काठ्यांचे खोकेही होण्याचे काम सुरू आहे.वसमत शहरात जागा दिसेल तिथे अतिक्रमण करण्याचा सपाटा सध्या लागलेला आहे. वर्षभरापूर्वी अतिक्रमणमुक्त केलेल्या जागा पुन्हा ‘जैसे थे’ झाल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटावसाठी केलेला खर्च व वेळ वाया गेला आहे. आता तर सहा महिन्यांपासून अतिक्रमण करण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. अतिक्रमण करून जागा धरली तर घर क्रमांक मिळणार अशी अफवाही अधूनमधून पसरविली असल्याने मोकळी जागा आता शिल्लक राहते की नाही, अशी अवस्था आहे.सर्व्हे नं. १५०, सर्व्हे नं. १८० मधील नगरपालिकेच्या मालकीच्या जागा कागदपत्रांच्या हेराफेरीद्वारे खाजगी मालमत्ता झाल्या त्याची साधी दखल प्रशासन घेईना झाले. गावातील एकही पदाधिकारी, नेता, संघटना शासकीय जागांच्या विल्हेवाटीबाबत आवाज उठवण्यासाठी पुढे येत नाही.कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांची विल्हेवाट लावणाऱ्यांविरोधात काही झाले नाही तर रस्त्याच्या कडेला हॉटेल, टपºया इ. अतिक्रमण केले तर काय बिघडले? असा बोचरा सवालही उपस्थित केला जात आहे. शहर सुंदर व्हावे, विकास व्हावा, या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी अतिक्रमणमुक्त शहर व्हावे, असे कोणाला वाटतच नसल्यासारखे चित्र आहे.पंचायत समिती, यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल, गंगाप्रसादजी अग्रवाल व्यापारी संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल, नं.प.चे गार्डन, जलशुद्धीकरण केंद्र, शंकरराव चव्हाण, व्यापारी संकुल, कारजा चौक ते पोलीस ठाणे रस्ता, पोलीस ठाणे ते कारखाना रोड, रस्ता आदी मुख्य संकुल परिसर व रस्त्याशेजारी टपºया उभ्या करून जागा धरण्याची स्पर्धा लागलेली आहे. अतिक्रमण वाढण्याचा वेग पाहता नगरपालिकेने वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिद्ध करून अतिक्रमणधारकांना इशारा दिला होता. मात्र त्याचा काहीही परिणाम दिसत नाही. इशारा दिल्यानंतर नगरपालिकेने प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण करणारेही बिनधास्त आहेत. शहराच्या बकालपणापत भर घालणारे हे अतिक्रमण त्वरित हटवण्याची कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा पक्के झालेले अतिक्रमण काढण्यास प्रशासनाला पुन्हा वेळ व पैसा खर्च करण्याची वेळ येणार आहे.जि.प.च्या मैदानावर मुख्य रस्त्याच्या बाजूने चारही दिशेने अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी काठ्या रोवून जागा आरक्षित केल्या.तर काहींनी पक्की खोकी लावली आहेत. कोट्यवधींची ही जागा अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.पोलीस ठाणे ते हाडसींग सोसायटी रस्त्यावर तर रस्त्याच्या मधोमधच अनधिकृत व्यापारी संकूल झाले आहे. ३० ते ३५ दुकाने पक्के बांधकाम करून परस्पर विक्री व किराया वसूली होत आहे. अतिक्रमणाने रस्त्याचे दोन भाग झालेले आहेत. नगर पालिकेच्या जागेवर झालेले दुकाने अधीकृत की अनाधिकृत हे पाहण्याची तसदी कोणी घेतांना दिसत नाही.
वसमतमध्ये वाढतोय अतिक्रमणे करण्याचा वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:16 AM