सेनगाव (हिंगोली ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रा मध्ये वाढ होणार आहे.हिगोली बाजार समिती मध्ये समावेश असलेल्या तालुक्यातील पन्नास गावाचा येथील बाजार समिती कार्यक्षेत्रा मध्ये समावेश होणार आहे.त्या करीता शासकीय प्रकिया सुरू झाली असुन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अधिसूचना जारी केली आहे.
हिगोली कृषी उत्पन्न बाजार समिती मधून विभाजन करुन १९९३ ला सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली.त्या वेळी बाजार समिती कार्यक्षेत्रा मध्ये तालुक्यातील केवळ ७५ गावाचा समावेश करण्यात आला होता.तर तालुक्यातील गोरेगाव,पुसेगाव,सवना,आजेगाव ,बाभूळगाव या महत्त्वाचा जि.प.गटातील पन्नास गावे हिगोली बाजार समिती कार्यक्षत्रा मध्येच समाविष्ट होती.शासकीय दृष्टा प्रकार गैरसोयीचा होता.मागील अनेक दिवसांपासून सेनगाव बाजार समितीचे कार्यक्षम वाढवून तालुक्यातील सर्व गावे समाविष्ट करावी अशी मागणी होती.त्या मागणीचा अनुषंगाने व सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक व्यवहारता सुनिश्चित करण्यासाठी हिगोली बाजार समिती मध्ये समाविष्ट असलेल्या तालुक्यातील पन्नास गावाचा सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रा मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीता जिल्हा उपनिबंधक अधिकारी सु.प्र.मैत्रवार यांनी ९ जुलै ला अधिसूचना जारी केली आहे.
या गावाच्या समावेशा करीता आक्षेप ,सुचना असतील तर एक महिन्याच्या आत आपले आक्षेप दाखल करावे असा आशयाची अधिसूचना काढली आहे.लवकरच हि प्रक्रिया पुर्ण झाला नंतर सेनगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रा मध्ये वाढ होणार आहे शेतमालाचा व राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाची पन्नास गावे सेनगाव बाजार समिती मध्ये समाविष्ट होत असल्याने त्यांचा निश्चितच बाजार समितीच्या उत्पन्ना मध्ये वाढी मध्ये फायदा होणार आहे.त्या शिवाय बाजार समितीच्या राजकीय समीकरणावर याचा निश्चितच परिणाम जाणवणार आहे.
या गावाचा होणार समावेश :गोरेगाव,पुसेगाव,वरुडकाझी,वरूड समद,जांभरुण,माहेरखेडा,गुगूळ पिंपरी,भगवती,पारडी पोहकर,हिवरा ,माझोड,कडोळीतपोवन,गारखेडा,सुरजखेडा,सवना,वायचाळ पिंपरी,ब्राम्हणवाडा,चोंढि बु,चोंढि खु,बाभुळगाव,सावरखेडा,जवळा बु, सुलदली,वलाना,मन्नास पिंपरी,केंद्रा खु,केंद्रा बु, जामठी बु,गोधन खेडा,कहाकर खु,वरखेडा,ताकतोडा,हाताळा ,पळशी,आजेगाव,सिंदेफळ ,शिवणी बु,शिवणी खु,बेलखेडा ,देवुळगाव जहागिर,शेगाव खोडके,खैरखेडा ,माळसी,आडोळ,हानकदरी,रेपा,लिगंपिपरी,पिपंरी लिंग, आदी गावाचा समावेश आहे.