लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन संशयित हिवताप, डेंग्यू आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालय तथा खाजगी रुग्णालयामध्ये आढळून येत आहेत. सदर रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमधील कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत अॅबेटिंग करण्यात येत आहे. त्यामुळे सदर कीटकजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच बरोबर हिवताप, डेंग्यू आजारावरील नियंत्रणासाठी जनतेने सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळावा, सभोवतालच्या परिसरामध्ये (नारळाची करवंटी, टायर्स व फुलाच्या कुंड्या, डबक्यांमध्ये पाणी साचू देऊ नये, ज्यामुळे डासोत्पत्ती स्थानांची निर्मिती होणार नाही. व विविध आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. नागरिकांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव; आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:38 AM