लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील २५ हेक्टरच्या भव्य मैदानावर १० फेब्रुवारी रोजी आरोग्य प्रशासनाच्या वतीने मोफत ‘अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास सव्वालाख रुग्णांनी तपासणी केली. त्यानंतरही तपासणी सुरूच होतीगरजू रूग्णांना उपचार मिळावेत यासाठी हिंगोली येथे अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करयात आले होते. शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने उपचारासाठी रूग्ण शिबीरात आले. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर व शिबिराच्या ठिकाणी रूग्णांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र होते. परिसरात अस्वच्छता पसरणार नाही, याची पालिकेच्या विभागाकडून दक्षता घेण्यात आली. या महाशिबिरास येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था केली होती. येणाºया प्रत्येक रुग्णांचे समाधान होईल याची काळजी घेण्याच्या सूचना सर्व अधिकारी कर्मचाºयांना दिल्या होत्या. शिबिरासाठी जिल्हाभरातील विविध आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात ६५ हजार रुग्णांची पूर्वतपासणी करण्यात आली होती. त्या सर्व रुग्णांची राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी झाल्यानंतर नागपूर येथे सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.महाआरोग्य शिबिरात दुपारी ३ च्यानंतर रूग्णांची तपासणी केली जात होती. त्यामुळे रूग्णांची संख्या १ लाख ३० हजारांपुढेही जाऊ शकेल, असे सांगण्यात आले.सव्वा कोटींची औषधी वितरण४शिबिरात सुमारे सव्वा कोटी रुपयांची औषधी वितरण केली. तसेच रुग्ण व नातेवाईकांसाठी जेवण, चहा, पाणी याची व्यवस्था केली होती. या आरोग्य शिबीरात ज्यांच्यावर उपचार करणे शक्य नाही, अशा रुग्णांना नागपूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे नेवून त्यांच्यावर अत्याधुनिक पध्दतीचे उपचार केले जाणार आहेत. महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिका आवश्यक वेळी तात्काळ उपलब्ध करून दिल्या जात होत्या.शिबीरात २९ विभाग४महाआरोग्य शिबिरात येणाºया रूग्णांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, याबाबत नियोजन करण्यात आले होते. परिसरात २९ विविध विभाग स्थापन केले होते.यशस्वीतेसाठी आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, माजी खा. शिवाजी माने,माजी आ. गजानन घुगे, शिवाजी जाधव, सीईओ एच.पी. तुम्मोड, रामेश्वर नाईक, संदीप जाधव, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, तहसीलदार गजानन शिंदे, मुख्याधिकारी रामदास पाटील, आरटीओ अधिकारी अशोक पवार, डॉ. सचिन बगडिया व विविध विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.रूग्णांना आली चक्कर..४महाआरोग्य शिबिरात उपचारासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. यावेळी काही वद्ध रूग्णांना उन्हामध्ये रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याने चक्कर आली होती. यावेळी तात्काळ या रूग्णांना शिबिरातील अपघात विभागात १०८ रूग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी या रूग्णांवर उपचार केले.महाआरोग्य शिबिरात उपचारासाठी रूग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांची चुकामूक झाल्यास मदत केंद्रातर्फे ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती दिली जात होती.दीड हजार डॉक्टरांमार्फत तपासणी; मोबाईल व्हॅन४शिबिरामध्ये विविध पॅथीचे सुमारे दीड हजार डॉक्टर्स आणि २९ ओपीडींमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच दंतचिकित्सा व शस्त्रक्रियेसाठी चार मोबाइल व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तपासणीशिवाय एकही रुग्ण येथून परत जाणार नाही. यांची खबरदारी घेतली जात होती. स्वतंत्र व्यवस्था करुन येथे येणाºया प्रत्येक रुग्णांना मार्गदर्शनही करण्यात आले.आरोग्य शिबिरासाठी येणाºया गरीब व गरजू सर्व रुग्णांना नि:शुल्क भोजन व पिण्याच्या पाण्याची सुविधा केली होती. रुग्णांना औषध व आवश्यक साहित्य पुरविण्यात आले. नोंदणी झालेल्या रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यकतेनुसार औषध, एमआरआय, सीटीस्कॅन, रक्ताच्या तपासण्या, शस्त्रक्रिया व आवश्यकतेनुसार यंत्रही देखील उपलब्धत केले जात होते.
अटल शिबिरात सव्वा लाख रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:29 AM