फाळेगाव आराेग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या माळहिवरा, कनेरगाव नाका येथे काेविड - १९ चे लसीकरण करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. त्या अनुंषगाने शनिवारी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. नामदेव काेरडे यांच्यासह आराेग्य पथकांच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. माळहिवरा प्राथमिक शाळेमध्ये केंद्र स्थापन केले आहे. त्या ठिकाणी पाच खाेलीची निवड केली असून नोंदणीसाठी, लसीकरण, एक खाेली नियत्रंणाखाली ठेवण्यात येणार आहेत. तसेच परिसराची स्वच्छता, पाणी व्यवस्था, इंरटनेटसह आवश्यक साेईची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी ॲड. अमाेल जाधव, मु. अ. आरू, रत्नाकर जाधव, सुनील जाधव, श्रीराम पवार, गजानन जाधव, राम जाधव, नारायण आरे, ज्ञानेश्वर उंडाळ, शिवाजी लाेंढे, उषा गुठ्ठे, कल्याणी जाधव, शेख, मगर, माेटे, शेंडगे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती हाेती.
काेविड-१९ लसीकरण केंद्राची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:22 AM